पिंपरी चिंचवड : सासूच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. पिंपरी चिंचवडमधील भीमनगरमध्ये काल संध्याकाळी ही घटना घडली.


पुष्पा लोखंडे असं मृत नवविवाहितेचं नाव आहे. आत्महत्येच्या प्रयत्नानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. महिन्याभरापूर्वीच पुष्पाचं लग्न झालं होतं.

सासूकडून छळ केला जातो, असं पुष्पाने काही दिवसांपूर्वी माहेरच्यांना सांगितलं होतं, असा दावा पुष्पाच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पुष्पाचं माहेर पिंपरी चिंचवडमधील दिघीमध्ये आहे.