Supriya Sule : विरोधी पक्ष नेते अजित पवार (Supriya Sule) यांनी  पक्ष संघटनेत मागितलेल्या जबाबदारीच्या मागणीची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी पक्षात पद द्या अशी मागणी केली अशी चर्चा माझ्या कानावर तरी अजूनही आलेली नाही. पण, एका वर्तमानपत्रात अशी बातमी आली. अजितदादा यांना कोणतं पद मिळेल याची मला माहिती नाही. मात्र बैठकीत यासंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल, असं त्या म्हणाल्या. इंदापूर येथे माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून इन्फोसिसच्या सहकार्यातून 800 संगणक आणि कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. 



Supriya Sule : 'जयंत पाटलांवर ईडीची.. कारवाई याचं आश्चर्य नाही'


जयंत पाटलांवर ईडी कारवाई झाली  यात मला काही आश्चर्य वाटत नाही. राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, जयंत पाटील अशा अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांवर महाराष्ट्रात आणि देशात अशा कारवाया होतात. आतापर्यंत ज्या कारवाया किंवा आरोप झाले ते 98 टक्के विरोधी पक्षांवरच झाल्यात. जो विरोधात बोलतो त्यावर केस होते हे पहायला मिळत असल्याचं त्या म्हणाल्या.


Supriya Sule : 'पंढरपूरमध्ये के. चंद्रशेखर राव यांचं स्वागत'


तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे पंढपूरमध्ये सभा घेणार आहेत. त्यावरदेखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीआरएसचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचं पंढरपूरमध्ये स्वागत आहे. अतिथी देवो भव असे आपण म्हणतो. त्यामुळे त्यांचे स्वागत आहे. आपल्या महाराष्ट्रात पाहुण्यांचे स्वागत करण्याची परंपरा आहे, असं त्या म्हणाल्या. 


Supriya Sule : आम्ही दडपशाहीवाले नाही तर...


काल पाटना येथे सगळ्यांची बैठक झाली त्यावर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीका केली आहे. त्यांच्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही दडपशाहीवाले नाही तर लोकशाहीवाले आहोत. त्यामुळे विरोधकांनी आमच्यावर टीका करु नये असं काही नाही. आम्ही दिलदार आहोत. त्यामुळे त्यांनी दिलदारपणे टीका करावी.


Supriya Sule : बावनकुळे बारामतीत आले तर गैर काय?


 


भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन हे बारामती दौरा करणार आहेत. त्यांचं बारामतीत स्वागतं असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. कुणी कुठंही जावं. लोकशाही आहे. त्यामुळे ते बारामतीत आले तर गैर काय?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. बावनकुळे कुठल्या विकासकामांची पाहणी करायची असेल तर त्याचंही आम्ही नियोजन करु, असंही त्या म्हणाल्या. 


हेही वाचा-


Monsoon : मान्सूनसाठी तारीख पे तारीख! हवामान खात्याचा अंदाज चुकतोय का? पुण्यात पाऊस कधी पडणार?; तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं...