Pune Crime News : पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात (Pune Crime News ) गुन्हेगारी वाढत आहे. त्यातच आता नवा प्रकार पुढे आला आहे. पुण्यातील एका प्राध्यापिकेला विद्यार्थ्यांने व्हॉटसअप कॉल करुन बदनामी करण्याची भीती दाखवली आणि त्यांचा अश्लिल व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत 5 हजार अमेरिकन डॉलरची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर प्राध्यापिकेने पोलिसांत धाव घेतली आणि या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police News) मयांक सिंग (वय 26, रा. पाटणा, बिहार – Patna, Bihar) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


तुम्ही जर मी सांगतो असे केले नाही तर मी तुमची विद्यापीठात बदनामी करेल,” अशी भीती घालून त्यांना अंगावरचे कपडे काढण्यास भाग पाडले. हा प्रकार मार्च 2020 पासून आतापर्यंत सुरु होता. (Pune Crime News) याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून काम करतात. तेथील मयांक सिंग याने त्यांच्याशी इन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून संपर्क साधला. त्यानंतर त्याने व्हॉटसअप कॉल करुन त्यांना “तुम्ही जर मी सांगतो असे केले नाही तर मी तुमची विद्यापीठात बदनामी करेल,” अशी भीती घालून त्यांना अंगावरचे कपडे काढण्यास भाग पाडले. त्याचा व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केला. 


या विद्यार्थ्यांने हा व्हिडीओ कॉल इंस्टाग्रामवर व्हायरल केला. त्यानंतर त्याने दुसऱ्या आयडीवरुन अनेक ऑडिओ व व्हीडिओ कॉल केले. त्यानंतर वेगळ्या आयडीवरुन त्याने प्राध्यापिकेला आणि त्यांच्या पतीला न्यूड व्हिडिओ पाठवून त्यांच्या 5 हजार अमेरिकन डॉलरची मागणी केली. त्यानंतर त्यांनी न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. 


गुन्हेगारीत वाढ


पुण्यात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. त्यासंदर्भातील रोज नवे प्रकरणं समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवत मित्रानेच मैत्रिणीचा अश्लील व्हिडीओ पोर्न वेबसाईटवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पुण्यातील वारजे परिसरात हा प्रकार घडला होता. या प्रकरणात ते दोघेही जण अल्पवयीन असल्याचे तपासातून पुढे आले होते. वारजे पोलिस ठाण्यात याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांची सोशल मीडियावरुन ओळख झाली होती. दोघेही एकमेकांना भेटले देखील होते आणि त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली. मित्राने तिला आंतरराष्ट्रीय पॉर्नस्टार बनवतो, असं आमिष दाखवलं त्यानंतर तिला अश्लील व्हिडीओ तयार करायला सांगितलं. मुलाच्या सांगण्यावरुन तिने स्वत:चा अश्लील व्हिडीओ तयार देखील केला. मित्रावर असलेला विश्वासावर तिने हे कृत्य केलं. मात्र त्याच मित्राने तिला धोका दिला. त्या मित्राने सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ मागून घेतले आणि एका पॉर्न वेबसाईटवर अपलोड होते.


 हेही वाचा-


Baramari News : शिक्षकाचा प्रताप! दाऊ पिऊन वर्गातच झोपला; गावकऱ्यांनी काढला व्हिडीओ, विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात?