बारामती: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मित्रपक्षातील धुसफूस दिसून येत आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यभरात आपलं प्रमोशन करण्यास सुरूवात केली. त्यामध्ये मुख्यमंत्री हा शब्द वगळला गेल्याने त्याबाबत नाराजी देखील व्यक्त केली गेली. याच दरम्यान बारामती शहर परिसरात लावलेल्या फ्लेक्सवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा फोटो न लावता फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त याचं सर्व श्रेय घेत असल्याची भावना महायुतीतील नेत्यांनी अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त आहे. त्यातून हा फ्लेक्स लावला गेला असावा, अशा शक्यता देखील वर्तवली जात आहे.


सध्या बारामती भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री यांचा फोटो असलेला लावलेला बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. पण त्या फ्लेक्सवर राष्ट्रवादीकडून सावध प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अजित पवारांचा (Ajit Pawar) फोटो न लावल्याने चर्चा रंगली होती. राष्ट्रवादीने अजित पवारांचा फोटो चुकून राहिला असावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने दिली आहे.


लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून बॅनरवॉर?


बारामतीतल्या मेदडमध्ये देवा भाऊ लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला अशा आशयाचा फलक बारामतीत लागला आहे. फ्लेक्सवर महापुरुषांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा फोटो या फ्लेक्स वरून गायब आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती जनसन्मान रॅली पार पडली. त्यावेळी फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्या बॅनर वरती फोटो लागले होते. म्हणून भाजपने लावलेल्या बॅनर वरती उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो लावण्यात आला नसल्याची बारामती जोरदार चर्चा रंगू लागली आहे.


अजित पवार यांच्या फोटोला फ्लेक्सवरून वगळलंं?


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यात मोरगाव रस्त्यावर एका होर्डींगवर देवाभाऊंचा फ्लेक्स लावण्यात आला आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री शिंदे यांनाही स्थान देण्यात आले आहे. शिवाय महापुरुषांचे फोटो देखील त्यावर लावण्यात आले आहेत. मात्र. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फोटोला फ्लेक्सवर स्थान देण्यात आलेले नाही. त्यांचा फोटो वगळून हा फ्लेक्स कोणी लावला असावा अशी चर्चा देखील शहरात सुरु आहे.फ्लेक्स लावलेल्या व्यक्तीचं नाव त्यावर लिहलेलं नाही.