पुणे: पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे मुळशी तालुक्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा, सून वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर फरार झाले आहेत. वैष्णवीवर तिच्या सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी अमानुष छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सासरे राजेंद्र हगवणे, सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नावेळी वैष्णवीच्या माहेरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी दिली होती. मात्र त्यानंतरही सासरच्यांनी दोन कोटी रुपयांची जमीन खरेदीसाठी मागणी करत सतत दबाव आणला. ही रक्कम न दिल्याने पती शशांककडून धमकी दिली जात होती आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात येत होता. या सर्व मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवीने घरात गळफास लावून आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
रेंट पॉईझन जेवणातून खावून स्वःचा जीव संपवण्याचा प्रयत्न
एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी ऑगस्ट 2023 मध्ये गरोदर असताना याची माहिती पती शशांक याला सांगितली असताना त्याने चारित्र्यावर संशय घेवून हे बाळ माझे नाही दुसऱ्या कोणाचे तरी असेल असे म्हणून पती शशांक व सासरचे लोकांनी तिच्यासोबत भांडण करुन सून वैष्णवीला मारहाण केली होती. त्यानंतर शशांक याने वैष्णवीला जबरदस्तीने शिवीगाळ व मारहाण करुन माझ्या घरातून चालती हो, नाहीतर मी तुला हाकलुन देईन असे म्हणून राहत्या घरातुन हाकलून दिले होते. त्यानंतर वैष्णवी ही माहेरी आल्यानंतर तिने तिच्यासोबत होत असलेल्या छळवणुक व हुड्यासाठी पैशाची मागणी याबाबतची माहिती तिच्या आईवडीलांना दिली होती. त्याचबरोबर सासरच्या कुटुंबियांकडुन मानसिक त्रास सहन न झाल्याने दि. 27 नोव्हेंबर 2023 रोजी वैष्णवीने जाचाला कंटाळुन औषध (रेंट पॉईझन) जेवणातून खावून स्वःचा जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक माहिती एफआयआरमधून समोर आली आहे.
जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी
जेव्हा पहिल्यांदा वैष्णवीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा तिला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यामुळे तिचा जीव वाचला होता, तिच्यावरती 4 दिवस उपचार सुरू असताना तिचे सासरचे कोणतेही नातेवाईक तिला बघण्यासाठी देखील दवाखान्यात गेले नाहीत, त्यानंतर वैष्णवीची तब्येत ठीक झाल्यानंतर तिला पुन्हा सासरी पाठवुन देण्यात आलं. त्यानंतर साधारण 15 दिवसानंतर तिचा पती शशांक याने वैष्णवीच्या माहेरी जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली. त्यावेळी तिच्या माहेरून पैसे न मिळाल्याने जावई शशांक यांनी घरी जावून वैष्णवी हिस 'तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत, तुझ्या बापाला काय भिक लागली काय, मी तुला काय फुकट पोसणार आहे काय, तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत तर मी तुझ्या आख्या खानदानाचा काटाच काढतो' असं म्हणत वैष्णवीला धमकी दिली होती. याबाबत वैष्णवीने माहेरी सांगितलं असल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे.
नेमकं प्रकरण काय?
राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी घेतली. एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करुन देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करुन दिलं, अशी माहिती एफआयरमधून समोर आली आहे.त्याचबरोबर ते सर्वजण कोणत्याही कारणात्सव वाद घालून तिच्याबरोबर भांडण करत. लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागीतली ती दिली नाहीत म्हणुन त्याचा राग मनात धरुन सून वैष्णवीस घालुन पाडुन बोलून तिचे चारित्र्यावर संशय घेत सासु लता, नंनंद करीश्मा हागवणे, सासरे राजेंद्र हागवणे, दिर सुशील हगवणे यांनी शारीरीक व मानसिक त्रास देणं सुरू केलं, अशी माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे.