Nana Patole On Baramati: बारामतीचा विकास झाला त्यामध्ये काँग्रेसचे मोठं योगदान आहे, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. पुणे जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग आयोजित कार्यकर्ता मेळावा आज बारामतीत आयोजित केला होतो. त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि इतर मान्यवर उस्थितीत होते. या कार्यक्रमात नाना पटोले बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
मनुवादी लोक सावित्री बाईचा खरा इतिहास लपवत आहेत. ज्योतिबा फुले यांचे कर्तृत्व मोठं होत म्हणून आंबेडकरांनी ज्योतिबा फुलेंना गुरू मानले. भाजपने सांगितले होते की धनगरांना आदिवासींचे प्रमाणपत्र देऊ पण आता पर्यंत मिळाले नाही. फडणवीस म्हणत होते की सत्ता द्या, ओबीसींना जणगणना करू आजपर्यंत झाली नाही. जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा ओबीसीची जातीनिहाय जणगणना करू असं राहुल गांधींनी सांगितले आहे, असे नाना पटोले म्हणाले. सत्तेत बसून भाजप देशाला संपवण्याचे काम करत आहे, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
बारामतीचा विकास झाला त्यात काँग्रेसचे मोठं योगदान आहे. बारामतीचे काँग्रेसची इमारत नव्याने बांधू. बारामतीला साजेशी इमारत करू. बारामतीत काँग्रेस मजबूत करू. बारामतीत काँग्रेसची इमारत मजबूत करू असं म्हणत आहोत. नाहीतर पत्रकार वेगळ्या बातम्या लावतील. की बारामतीत काँग्रेस मजबूत करू म्हणून.....असा मिश्किल वक्तव्यही त्यांनी केलं.
राहुल गांधी सोबत काही दिवस चाललो तेव्हा मला सगळे देव आठवले. कोरोनाची लस आपल्याला दिली. त्यामुळे अनेक लोकांना अटॅक येत आहेत. त्याविरोधात लोक कोर्टात गेलेत. आणि सरकारने कोर्टात सांगितले की, ती आमची जबाबदारी नाही. ती लस बनविणाऱ्या कंपनीची जबाबदारी आहे. लस देताना बॅनरवर फोटो कुणाचा होता? लोकांचे जीवन ही सरकारची जबाबदारी आहे. पण जेव्हा जबाबदारी घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणाले कंपनीची जबाबदारी, असा टोला पटोले यांनी लगावला.
सरकार नोकरी देत नाही. 2014 ते 2019 मध्ये दर सहा महिन्याला भरती काढायचे. मुले अर्ज भरायचे आणि परत काहीतरी करून परीक्षा रद्द केली. ओबीसी समाजातील लोकांना लुटण्याचे काम सुरू आहे. राम मंदिरासाठी पैसे गोळा केले होते. तेव्हा मी प्रश्न विचाराला. कोणाच्या आदेशाने पैसे गोळा करत आहात? त्यावेळी सगळे माझ्या अंगावर आले. आणि दुसऱ्या दिवशी निधी गोळा बंद केला. रामाचे मंदिर बनवायला सरकार पैसे करत आहेत. मग आपण दिलेलं पैसे कुठ आहेत? धर्माच्या नावाखाली हे लोक आपल्याला मूर्ख बनवतात..... मोदी सरकारने आश्वासने दिली ती पूर्ण केली नाहीत. शाई फेक केली तर माझ्या नावाने शिव्या घालतात. मी काय केलं? मी तर काहीच केलं नव्हत तरी मला बोलले. भीक मागून शाळा केली असं म्हणतात. मग लोक काय करतील? अजूनही त्यावर माफी मागायला तयार नाहीत. महापुरषांच्या अवमानवर गुन्हे दाखल का केले नाहीत? पोलीस आणि पत्रकारावर गुन्हा दाखल केला. ही पेशवाई झाली. आता जागे होण्याची वेळ आली आहे. या उखडून टाकण्याची वेळ आली आहे. आधी विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होता आता पुण्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहे. मोदींना पत्र लिहून शेतकरी आत्महत्या करीत आहेत, असे पटोले म्हणाले.