Nagar Parishad Election 2025:  राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा माहोल तापला असून उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर निवडणूक चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. महायुतीत एकीकडे मतभेद उफाळून येत असताना अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष आमने-सामने येताना दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतही जोरदार संघर्ष रंगू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने पहिला बाजी मारत एक जागा बिनविरोध मिळवली. त्यानंतर भाजपनेही प्रभाव दाखवत सलग तीन जागा बिनविरोध जिंकत आपली ताकद दाखवून दिली आहे.

Continues below advertisement

पुण्याच्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. महायुती म्हणून लढणाऱ्या भाजपचे यात तीन तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक नगरसेवकाचा समावेश आहे. दीपक भेगडे, शोभा परदेशी आणि निखिल भगत या भाजपच्या आणि हेमलता खळदे या अजित पवारांच्या उमेदवारांना बिनविरोध नगरसेवक होण्याची लॉटरी लागली आहे. त्यामुळं तळेगाव मध्ये आता नगराध्यक्ष पदाची आणि उर्वरित तेवीस जागांवर 2 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया राबवली जाईल.

राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडू लागला असून उमेदवारांची नावं जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवर चुरशीची लढत रंगू लागली आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीतही महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी युती जाहीर केली असली तरी दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे आपली ताकद दाखवताना दिसत आहेत.

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने १३ नोव्हेंबर २०२४ रोजी ९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज पक्षाला तळेगावात पहिलं मोठं यश मिळाले असून प्रभाग क्रमांक ९ मधील हेमलता खळदे बिनविरोध निवडून आल्या. आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित गटाने तळेगावात दमदार खाते उघडत प्रभावी शक्तीप्रदर्शन केले.

भाजपनेही लगेचच जोरदार मुसंडी मारत एकाच वेळी तीन जागा बिनविरोध जिंकल्या. दीपक भेगडे, शोभा परदेशी आणि निखिल भगत हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भाजपचे पहिले खाते जोरदारपणे उघडले आहे.तळेगाव निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट १७ जागांवर तर भाजप ११ जागांवर मैदानात उतरले आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत राष्ट्रवादीची १ आणि भाजपच्या ३ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. या संपूर्ण निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने तळेगाव दाभाडेचा राजकीय रंग अधिकच चर्चेत आला आहे.

Pen Mahanagarpalika: पेण नगरपालिका निवडणुकीत निवडणुकीआधीच राष्ट्रवादी विजयी

पेण नगरपालिका निवडणुकीत निवडणुकीआधीच राष्ट्रवादीच्या वसुधा पाटील प्रभाग ९ मधून बिनविरोध विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे. पेण नगरपालिका नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी रामवाडी येथील प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवार वसुधा पाटील यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला होता परंतु नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाला रामवाडी येथील प्रभाग क्रमांक ९ मधून त्यांच्या विरोधात कोणत्याही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला नसल्याने वसुधा पाटील या नगरसेवक पदासाठी बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,मंत्री आदिती तटकरे,माजी आमदार अनिकेत तटकरे,  यांनी वसुधा पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

तर नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 प्रभाग क्रमांक आठ ब मधून शिवसेनाच्या (शिंदे गट) खान जुबेदाबी गफार खान  यांची नगरसेवक पदी बिनविरोध निवड झाली.

Jalgaon mahanagrpalika: जळगाव जिल्ह्यात भाजपचे 3 नगरसेवक  बिनविरोध विजयी

जिल्ह्यात सावदा, भुसावळ, आणि जामनेर 3 नगरसेवक भाजपचे या ठिकाणी बिनविरोध विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीला या ठिकाणी झटका बसला आहे. भुसावळमध्ये भाजपच्या उमेदवार नगरसेवक प्रीती मुकेश पाटील बिनविरोध विजयी झाले आहेत.या ठिकाणी भाजपचा जल्लोष पाहायला मिळाला आहे. सावदा रंजना भारंबे भाजपच्या नगरसेवक बिनविरोध निवडून आल्या आहेत.गिरीश महाजन यांच्या जामनेरमध्ये उज्वला तायडे बिनविरोध छाननी वेळी झाले आहेत.