Pragati Express :  मुंबई - पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  कोरोना काळात   रद्द करण्यात आलेली मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस व्हिस्टाडोम कोचसह धावणार आहे. या कोचमुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान निसर्गाचे विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे. सोमवार (25 जुलै) पासून ही एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.


मुंबई - पुणे मार्गावरील ही तिसरी ट्रेन आहे जी व्हिस्टाडोम कोचसह धावणार आहे. डेक्कन क्वीन आणि डेक्कन एक्सप्रेसमध्ये  व्हिस्टाडोम  कोचसह धावणार आहे. प्रगती एक्सप्रेस तिच्या नेहमीच्या वेळेत सकाळी 7 वाजून 50 मिनीटांनी पुण्यातून सुटणार आणि 11 वाजून 25 मिनिटांनी मुंबईला पोहचणार आहे. तर संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून 4 वाजून 25 मिनिटांनी रवाना होणार आहे तर 7 वाजून 50 मिनिटांनी पुण्यात पोहचणार आहे.


पुणे-मुंबई मार्गावरील विस्टाडोम कोचमधून प्रवास करताना, प्रवासी नदी, दरी, धबधबे या दृश्यांचा आनंद घेतात. ज्यात माथेरान टेकडी, सोनगीर टेकडी, उल्हास नदी, खंडाळ्यातील घाट भागांचा समावेश आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे वरील विहंगम दृष्य टिकण्यासाठी हा विस्टा डोम बसवण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांना निसर्ग सौंदर्य अनुभवता आलं. व्हिस्टाडोम कोचच्या विशेष आकर्षणांमध्ये रुंद खिडकीचे फलक आणि काचेचे छप्पर, फिरता येण्याजोग्या जागा आणि पुशबॅक खुर्च्या  आहेत. विस्टाडोम कोच हा भारतीय रेल्वेचा एक नवीन उपक्रम आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवासही संस्मरणीय होतो. त्याचबरोबर पर्यटनालाही चालना मिळते. ज्या ट्रेनमध्ये हा डबा बसवला जात आहे त्या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी एकूण 44 जागा आहेत. या आसने तर आरामदायी तर आहेतच शिवाय पाय मोकळी भरपूर जागा आहे. यामध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत लोकही आरामात प्रवास करू शकतात. फिरत्या खुर्च्या देखील आहे.


कसा आहे विस्टा डोम?


या विस्टाडोम कोचला तिन्ही बाजूंनी काचेच्या खिडक्या आहेत, हा कोच पूर्णपणे पारदर्शक आहे.  ट्रेन स्टेशनवरून निघून गेल्यावर लोक केवळ आतून दृश्ये पाहू शकत नाहीत तर त्यांची नोंदही करू शकतात. विस्टाडोम कोचचे छतही काचेचे आहे. रात्रीच्या प्रवासादरम्यान पर्वत आणि दऱ्यांमधून जाणारे सुंदर ढग, आकाशातील तारे आणि चंद्राची मंत्रमुग्ध करणारी दृश्ये लोकांना आवडतील