कंटेनर उलटल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्वपदावर
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2016 03:13 AM (IST)
पुणे : कंटेनर उलटल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. 20 टनांचा जॉब घेऊन जाणारा कंटेनर स्लीप झाल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अमृतांजन पुलाजवळ आज सकाळी सहा वाजता हा कंटेनर उलटला आहे. या अपघातानंतर एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक खंडाळ्यामार्गे वळवण्यात आली आहे. आजपासून सुरु झालेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक एक्स्प्रेस वेवरुन वळवण्यात आली होती. दरम्यान या अपघातामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांचा खोळंबा झाला आहे.