मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 17 Jul 2016 02:34 AM (IST)
पुणे : मुंबई- पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस 'वे'वर पहाटे 4च्या सुमारास भीषण अपघात झाला. कामशेतच्या दोन्ही बोगद्याजवळ मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडीतील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात चालकांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. द्रुतगती महामार्गावरील डीवायडरला मध्यरात्री 4 च्या सुमारास आय 20 ही गाड़ी MH-14 DF 5994 ही गाडी धडकली. या अपघातातील तिघेही पिंपरी परिसरातील रहिवाशी असून अमित सोलेभाविकर (वय 29, रा. यमुनानगर, निगडी), संतोष उडवंत (वय 38, रा. कर्वेनगर), शरद कृष्णराव पवार (वय 35, रा. वारजे) अशी या मृतांची नावे आहेत.