Common Password :  बँकिंग, सोशल मीडिया आणि अॅप्ससाठी पासवर्ड (Password) तयार करणे आणि लक्षात ठेवणं हे इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे बरेच लोक अतिशय सामान्य पासवर्ड वापरतात. हॅकर्स  कधीही ते क्रॅक करू शकतात. अलीकडेच, एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की भारतीयांसह जगातील बहुतेक लोकांनी 2023 मध्ये सर्वात सामान्य पासवर्ड वापरला आहे, जो '123456' आहे. पासवर्ड मॅनेजमेंट सोल्यूशन्स कंपनी NordPass नुसार, लोक 2023 मध्ये त्यांच्या स्ट्रीमिंग खात्यांसाठी सर्वात कमकुवत पासवर्ड वापरत आहेत. 


देशाच्या नावालाच बनवला आपला पासवर्ड...


नॉर्डपासच्या अहवालानुसार इंटरनेट वापरकर्ते आपल्या देशाच्या नावामुसार पासवर्ड ठेवत आहेत, उदाहरणार्थ तुमचा पासवर्ड इंडिया@123 वगरे. याच अहवालात नमूद करण्यात आले आहे की, या पद्धतीचा पासवर्ड ठेवण्याची संख्या भारतामध्ये जास्त प्रमाणात आहे.


हा पार्सवर्ड मागील वर्षी सगळ्यात जास्त लोकांनी वापरला होता...


मागील वर्षी तर लोकांनी चांगलीच शक्कल लढवल्याचं समोर आलं होतं. पासवर्ड हा शब्दच लोकांनी पासवर्ड म्हणून ठेवला होता. भारतातील काही लोकांनी Pass@123 या Password@123 या पासवर्डचा वापर केला होता. मागील वर्षी अनेकांनी याच पासवर्डमध्ये थोडेफार अक्षरं बदलून पार्सवर्ड वापरला आहे. 


31 टक्के लोकांनी वापरला न्यूमरिक पासवर्ड...


जगातील 31 टक्के लोकांनी आपल्याला सगळ्यात सोपा वाटणारा पासवर्ड ठेवतो.'123456789', '12345', '000000' यापैकी कोणतातरी पासवर्ड ठेवतो. मात्र हे सगळे कॉमन पासवर्ड ठेवणं प्रचंड धोक्याचं असल्याचं सायबर एक्सपर्ट सांगतात. आपण ठेवलेले कॉम पासवर्ड हॅकर्स 70 सेकंदात क्रॅक करु शकतात. 


कॉमन पासवर्ड धोकादायक....


आपल्यातील अनेक लोक कॉमन पासवर्ड ठेवत असतो. आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या अनेक अॅप्सला किंवा जिथे कुठे पासवर्ड वापरत असतो. त्याजागी जर कॉमन पासवर्ड वापराल तर धोका वाढण्याची शक्यता जास्त आहे. कारण आपल्या मोबाईलमध्ये आपला मेल आयडी  लॉगईन केलेला असतो. त्यात आपण अनेक पासवर्ड या मेलवर सेव्ह करुन करत असतो. गुगल अकाऊंटदेखील अटॅच असतं. मेलवर अनेक कामाची आणि आपली वैयक्तिक माहिती आपण सेव्ह करुन ठेवतो. हाच कॉमन पासवर्ड वापरला तर हॅकर्स सहजासहजी आपला डेटा चोरु शकतात. आपल्या डेटाचा चुकीचा वापरदेखील हॅकर्स करु शकतात. त्यामुळे पासवर्ड ठेवताना यापुढे नक्की विचार करा.


इतर महत्वाची बातमी-


तुमच्या खात्यात PM किसानचे पैसे जमा झाले का? झाले नसतील तर करा 'हे' काम अन्यथा....