पुणे: मुंबई पाठोपाठ मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यातही फेरीवाल्यांविरोधात आंदोलन छेडलं आहे. सिंहगड रोडवर राजाराम पुलाजवळ फेरीवाल्यांना हटवण्यात आलं आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी स्टॉलची तोडफोड देखील केली.

एफसी रोडवर मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हटवत त्यांच्या स्टॉलची तोडफोड केली. त्यामुळे आता मनसेनं मुंबईपाठोपाठ पुण्यातही फेरीवाल्यांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, ‘फेरीवाल्यांप्रश्नी न्यायालयाचे निर्देश पाळा, तसं झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार नाही.’ असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरुवार) मुख्यमंत्र्यांना दिला.

फेरीवाल्यांच्या आंदोलनावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर बाळा नांदगावकरांनी ही माहिती दिली.

यापुढे फेरीवाल्यांवर रेल्वे अथवा बीएमसीनं कारवाई न केल्यास फेरीवाल्यांवर कोर्टाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असंही मनसेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

एल्फिन्स्टन स्टेशनवर चेंगराचेंगरी होऊन 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मनसेनं अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर मनसेची गुंडगिरी : संजय निरुपम

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर आज राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

जैसी करनी, वैसी भरनी, संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर

राज ठाकरेंनी घेतली मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदेंच्या भेट 

… तर तुम्हालाही मार खावाच लागणार : संजय निरुपम

मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात


दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड

मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला 

फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं?

नितेश राणेंचा मराठी ‘स्वाभिमान’ जागा, मनसेला पाठिंबा