पुण्यात पाण्यावरुन मनसे आक्रमक, जलसंपदा विभागाच्या कार्यालयाची तोडफोड
एबीपी माझा वेब टीम | 03 May 2016 11:58 AM (IST)
पुणे : पुण्याहून दौंडला पाणी देण्याच्या निर्णयाच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता कार्यालयाची तोडफोड केली. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या आदेशानंतर आजपासून दौंडला अर्धा टीएमसीऐवजी एक टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मात्र, आपण काटकसरीनं राखून ठेवलेलं पाणी दौंडला देऊ नये, असा निर्णय महापालिकेतील पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. दरम्यान, पालकमंत्री गिरीश बापट यांनी सर्वांचा विरोध झुगारत दौंडला एक टीएमसी पाणी देणारच, असा निर्णय घेतल्यानं पुणेकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे.