पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीला आता अनेक महिने उलटले. याबबातची सुनावणी निवडणूक आयोगासह सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मात्र, अनेकदा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) आणि राज्यातील जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) एकत्रित यावे असं अनेक नेते म्हणतात. अशातच शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र येतील अशी चर्चा कार्यकर्त्यांमधून आता थेट आमदारांमध्ये देखील सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कालपासून (शनिवारी) अजित पवारांच्या (Ajit Pawar) आमदारांनी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याचा सूर आवळला आहे. या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशीच भावना आमदारांनी व्यक्त व्यक्त केली आहे. अशातच या नेत्यांना एकत्र आणण्याचं स्वप्न एक महत्त्वाकांक्षी नेता पुर्ण होऊ देणार नाही असं म्हणत अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी शरद पवार-अजित पवारांच्या एकत्रित येण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याच्या राजकारणातील सर्व घडामोडी पाहता आज कोण कोणत्या पक्षांमध्ये जाईल आणि कोणाश युती होईल याचा काही विश्वास आणि ताळमेळ राहिलेला नाही. भविष्य काळात अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्रित यावं असं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला देखील वाटतं. ते दोघे एकत्र आले तर आम्हाला आंनदच असेल पण हे स्वप्न काही महत्त्वकांक्षी नेता पुर्ण होऊ देणार नाही असं अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी म्हटलं आहे. तर तो महत्त्वकांक्षी नेता कोण आहे, शेळकेंचा रोख कोणाकडे आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पुण्यामधील अजितदादा गटाच्या तीन आमदारांनी जाहीरपणे शरद पवार आणि दादांनी एकत्र यावं असं बोलत आहेत. यामध्ये जुन्नरचे आमदार अतुल बेनके, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांचा समावेश आहे. या तिन्ही आमदारांनी एकत्र यावं, अशी भावना व्यक्त केली आहे.
अण्णा बनसोडेंनी मिसळला अतुल बेनकेंच्या सूरात सूर
राजकारणात कधी आणि काहीही होऊ शकतं असं अतुल बेनके यांनी म्हटलं होतं. साहेब आणि अजित दादा एकत्र आले तर मला आनंद होईल. मी दादांकडे तशी मागणी ही करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते असं अजित पवार (Ajit Pawar) गटातील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनीही अतुल बेनके यांच्या विधानचं समर्थन केलं आहे.
अजित पवार पुन्हा परत येण्यावर काय म्हणाले होते शरद पवार
पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार पुन्हा परत येणार का? या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, निवडणुका येतात आणि जातात. कुटुंब कायम राहतं. ते पुढे म्हणाले की, घरामध्ये सगळ्यांना जागा आहे. मात्र, पक्षांमध्ये जागा आहे की नाही हा व्यक्तिगत निर्णय मी घेणार नाही. माझे सगळे सहकारी संघर्षाच्या काळामध्ये मजबुतीने उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारेन आणि ती तयार झाली तर असे म्हणत त्यांनी हा निर्णय एकट्याचा होणार नसल्याचे स्पष्ट केले.
VIDEO - Sunil Shelke : शरद पवार आणि दादांनी एकत्र याव, मात्र महत्वाकांक्षी नेते स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही
संबधित बातम्या - Sharad Pawar, Ajit Pawar : निवडणुकीच्या तोंडावर साहेब आणि दादांसाठी मिले सुर मेरा तुम्हारा! अजितदादांच्या आमदारांच्या मनात चाललंय तरी काय?