पुणे : शिवसेना आमदार किशोर दराडे पुण्यातील बाजीराव रोडने जात असताना त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरने सायरन वाजवत कार चालवत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यावेळी एका सुज्ञ पुणेकराने गाडीचा सायरन का वाजत आहे म्हणून पाहिलं तर गाडीमध्ये आमदार किशोर दराडे बसले होते. यावेळी पुणेकरांनी गाडीची काच खाली घ्यायला लावली व ड्रायव्हरला शीट बेल्ट का लावला नाही असा जाब विचारला.
आमदार दराडे पुणेकरांकडे फक्त पाहतच राहिले
यावेळी आमदार दराडे हे पुणेकरांकडे फक्त पाहतच राहिले. त्याचबरोबर आमदार दराडे यांना खडे बोल सुनावले. आम्ही जनता आम्ही निवडून देतो तेव्हा ते आमदार आहेत. पोलिसांकडे पाहू नको असही या पुणेकराने आमदार दराडे यांना सुनावलं. आमदार किशोर दराडे हा सर्व प्रकार पाहत होते. शेवटी जाताना पुणेकरांनी शिव्याची लाखोली वाहत त्यांच्या समोरून काढता पाय घेतला.
नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी
दरम्यान, विविध कारणांमुळे गाजलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे यांनी विजय मिळवला होता. विजयासाठी 31 हजार 576 मतांचा निश्चित कोटा होता. दराडे यांनी प्रतिस्पर्धी भाजपशी संबंधित अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना पराभूत केले होते. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. पहिल्या पसंतीच्या मोजणीत उमेदवार कोटा गाठू न शकल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी झाली होती. किशोर दराडे यांनी मतांचा कोटा पूर्ण केल्यामुळे ते विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या