Earthquake in Mulshi taluka : महाराष्ट्राला एकीकडे पावसाचा तडाखा बसत असताना पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये( Earthquake in Mulshi taluka ) धरण भागात असलेल्या मौजे निंबाळवाडी आणि मौजे वडगाव वाघवाडी इथं  भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. या धक्क्यामुळे 500 मीटर जमीनला मोठ्या भेगा पडल्या आहेत. या दोन्ही गावात असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. हे दोन्ही गावं मुळशीतील डोंगराळ परिसरात आहे.


यंदा जास्त पाऊस झाल्याने मुळशीतील अनेक गावांना फटका बसला आहे. त्यात आता भुकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भुस्खलनासारखी स्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांची योग्य काळजी घेतली जात आहे.निसर्गातील बदलांमुळे मानवाला आता मोठा फटका बसताना दिसत आहे. कुठे पावसाने थैमान घातले आहे तर काही ठिकाणी पूर परिस्थिती आहे. अशात पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये भूकंपाचे हादरे जाणवले आहेत.


पुणे जिल्ह्यात यंदा भरपूर पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. भाटघर धरण आणि नीरा देवघर धरण या दोन्ही धरणात पुरेसा पाणीसाठा झाला आहे. मोठया धरणाचा जमिनीवर पडणारा ताण, खाण काम, मोठया रस्त्याचा कामासाठी सुरुंग लावाणं, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या अशा मानवनिर्मित कारणांमुळे देखील भूकंप होत असतात.



माळीणची पुनरावृत्ती नको म्हणून काळजी


पुणे जिल्हा प्रशासनाने मुळशी तालुक्यातील गुटके गावातील 14 कुटुंबांना दरड कोसळण्यापासून बचावाचा उपाय म्हणून खोऱ्यातील मोकळ्या जमिनीवर बांधलेल्या तात्पुरत्या निवासी इमारतींमध्ये स्थलांतरित केले आहे. पुणे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (ZP) आयुष प्रसाद यांनी गावाला भेट दिली आणि पावसाळ्याच्या सुरुवातीसह व्यक्ती आणि जनावरांच्या स्थलांतराचे निरीक्षण केले.यंदाच्या पावसाळ्यात कोणतीही जीवित हानी होऊ नये, यासाठी सुरुवातीपासून खबरदारी घेतली जात आहे. वस्तीच्या अगदी वरच्या जागेत मोठ्या जागेवर एक फूट सरकत असल्याचे गेल्या वर्षी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. भूगर्भशास्त्रज्ञांना तातडीने परिसरात दाखल करण्यात आले. अधिक अभ्यास केल्यावर भूस्खलन होतं असं आढळून आले. कठीण खडकाच्या पृष्ठभागावर उप-पृष्ठभागाचा प्रवाह देखील होता. ते धोकादायक असल्याने रहिवाशांना मागच्या वर्षी पुणे जिल्हा परिषदेने बांधलेल्या सभा मंडपात स्थलांतरित करण्यात आले होते.