पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये मराठा आरक्षणाचे आणखी पडसाद उमटत (Maratha Reservation) आहेत. मराठा क्रांती मोर्चाने तर आज चक्क सरकारचा दशक्रिया विधी घातला. आरक्षण देऊ, या आश्वासनाचा विसर पडलेलं सरकार मृत पडलंय. त्याच मृत सरकारचा मराठा क्रांती मोर्चाने दशक्रिया विधी घातला. चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिर घाटावर हे आंदोलन पार पडलं. दशक्रियेचे सर्व विधी पार पाडतानाचा काही मराठा बांधवांनी मुंडन ही केलं. मृतावस्थेत असणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी मराठा बांधवांनी असा पवित्रा घेतला.
राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांनी 40 दिवसांता अल्टिमेटम दिला होता. मात्र, या 40 दिवसात सरकारने मराठा आंदोलनाची दखल घेतली नाही आणि आरक्षणदेखील दिलं नाही, साधी चर्चा केली नाही त्यामुळे आम्ही सरकार मेलं असं सांगत सरकारचा दशक्रिया विधी करत आहोत. मागील काही दिवस मराठे शांत होते. मात्र त्यानंतर सगळ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मराठ्यांचे लोक आत्महत्या करत आहेत. सगळ्या राज्यात आंदोलनं केली जात आहे. मात्र तरीही सरकारला जाग येताना दिसत नाही आहे. याच मेलेल्या शासनाला जागं करण्यासाठी मुंडण करत दशक्रिया विधी केला असल्याचं सकल मराठा मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी सांगितलं आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी मराठ्यांचं साखळी उपोषण सुरु आहे. अनेक ठिकाणी मराठे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील गावागावात उपोषण सुरु आहे. भोर, वेल्हा, आंबेगाव, मुळशी, हडशी, काशीग या सारख्या लहानमोठ्या गावात मराठे एकवटले आहे. मराठ्यांचे कुटुंब अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरु करताना दिसत आहे. सोबतच महिला आणि लहानग्यांचादेखील समावेश आहे.
पुण्यात ठिकठिकाणी आंदोलन
औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे, बोपोडी आणि शिवाजीनगर येथील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चासह अनेक मराठा संघटनांनी आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात आजपासून सुरू होत आहे.
गोंधळाचं वातावरण
पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग नवले पुलाजवळ अडवला आहे. मराठा आदोलकांकडून टायरची जाळपोळ करण्यात आली आहे. त्यामुळे नवे पुलाजवळील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इतर महत्वाची बातमी-