पुणे | मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आता सकल मराठा समाज पुन्हा अक्रमक झाला आहे. आरक्षणासह ईतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चानं बेमुदत चक्री उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.


पुणे विभागीय कार्यालया समोर चक्री उपोषणाला आजपासून  सुरुवात केली आहे. उपोषणावेळी हिंसक कारवाया टाळण्यासाठी अचारसंहिताही मराठा क्रांती मोर्चाने आखून दिली आहे. उपोषण शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गानं करण्यात येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे.

कोपर्डीच्या पीडितेच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा, विद्यार्थी, शेतकर्‍यांच्या मागण्यांसह आंदोलकांवरील खोटं गुन्हे मागं घेण्यासह पंधरा मागण्या मराठा समाजाकडून करण्यात आल्या आहेत.