पुणे: ‘देशात ज्याप्रमाणे मोदी उत्तम पद्धतीनं सरकार चालवत आहेत. त्याच पद्धतीनं राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार चालवत आहेत. पण ठाकरे साहेबांना त्याचाच त्रास होत आहे.’ अशी टीका संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली. ते पुण्यातील प्रचारसभेत बोलत होते.
‘मुंबई महापालिकेतील हाताची सत्ता गेली तर आर्थिक नाड्या आवळतील.’ असं म्हणत पर्रिकरांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली.
दुसरीकडे पर्रिकरांनी पुण्यातील महापालिकेच्या कारभारावरही टीका केली. ज्याप्रमाणे पर्रिकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली त्याचप्रमाणे त्यांनी अजित पवारांवरही टीका केली. 'पुण्याची सत्ता गेली तर काय होईल याची अजित पवारांना चिंता आहे.' असं म्हणत पर्रिकरांनी टीका केली.
दुसरीकडे आज ठाण्यातील सभेत उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्रींवर निशाणा साधला. ‘धनुष्य बाणावर बटन दाबाच पण दिवा लागतो का तपासून पाहा. कारण सगळे थापाडे आहेत, काय करतील सांगता येत नाही. शिवसेनासोबत नसती तर स्वप्नात तरी खुर्ची बघितली होती का?’ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.
संंबंधित बातम्या:
शिवसेनासोबत नसती तर खुर्ची बघितली असती का?: उद्धव ठाकरे
भाजपच्या बँकेत मतांची गुंतवणूक करा, 5 पट विकास परतावा देऊ: मुख्यमंत्री
फडणवीस लवकरच माजी मुख्यमंत्री होतील : संजय राऊत
भाजपच्या बँकेत मतांची गुंतवणूक करा, 5 पट विकास परतावा देऊ: मुख्यमंत्री
‘आदित्य ठाकरे मुंबईसाठी अदखलपात्र’ : आशिष शेलार
जगात भ्रष्ट देशाचा पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंहांची ओळख होती : दानवे
‘टक्केवारीनं मुंबईचा घात केला’, पार्ल्यातील सभेत नितीन गडकरींचा आरोप
अमित शाहांची संपत्ती जाहीर, आता उद्धव ठाकरेंची करणार का? : माधव भांडारी
VIDEO : तो आहे देवेंद्र आमचा… भाजपचं कॅम्पेन साँग लाँच