चंदू चव्हाण यांना परत आणण्यासाठी हालचाली सुरु : मनोहर पर्रिकर
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2016 11:36 AM (IST)
पुणे: चुकून पाकिस्तानात गेलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांना परत आणण्यासाठी डीजीएमओ स्तरावरची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांनी दिली आहे. पुण्यात स्वच्छ भारत अभियानाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रीय पर्रिकरांनी ही माहिती दिली. तसेच त्यांनी यावेळी बोलताना शेकटकर समितीचा अहवाल संरक्षण मंत्रालयाला मिळाला असून त्यानुसार नवीन तंत्रज्ञान आणायचं काम सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी धुळ्यात चंदू चव्हाणच्या कुटुंबियांची भेट घेतली.