Manikrao Kokate : निवडून आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दम दिला, 100 दिवसाचा कार्यक्रम दिला, मस्ती कराल तर घरी जाल. आमचे पीएस आणि ओएसडी मुख्यमंत्रीच ठरवतात. आता आमच्याही हातात काही राहिलेले नाही. आता आम्हाला चांगलं काम करावं लागेल, असे म्हणत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी महायुतीच्या (Mahayuti) कामकाजाचं गणित सांगितलं आहे. पुणे (Pune News) येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राज्यस्तरीय पणन परिषदेतून ते बोलत होते.
नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
माणिकराव कोकाटे म्हणाले की, आम्ही मोठ्या संख्येने निवडून आलो. निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, माझ्यासह... त्यामुळे जास्ती मस्ती कराल तर घरी जाल, असे त्यांनी सांगितले. डिपार्टमेंटची कामे शिस्तीत लागली पाहिजेत, शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला. आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. आमच्या पण हातात काहीही राहिलेले नाही. त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल. पण आपणही नीट काम करा. आपली एक सांगड जर या ठिकाणी चांगली बसली तर निश्चितपणे समाजात एक प्रकारचा स्थैर्य निर्माण होईल, शाश्वती निर्माण होईल. त्यातून आपल्याला विकासाकडे पुढे जाता येईल, असे त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.
माणिकराव कोकाटेंची न्यायालयात धाव
दरम्यान, मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच शिक्षेला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटे हे आज (दि.24) सत्र न्यायालयात धाव घेणार आहेत. ते आज सत्र न्यायालयात होणार अपील दाखल करणार आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणीत वाढ होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या