मॅट्रिमोनियल साईटवरुन तरुणींना गंडवणारा 'लखोबा लोखंडे' अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 13 Jul 2018 02:44 PM (IST)
मॅट्रिमोनियल साईटवरुन तरुणींची फसवणूक करणारा आरोपी कृष्णा चंद्रसेन देवकाते याला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पुणे : मॅट्रिमोनियल साईटवर तरुणींशी संपर्क साधून लग्नाचं आमिष दाखवायचं आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून पसार व्हायचं, अशी मोडस ऑपरेंडी असलेल्या 'लखोबा लोखंडे'ला पुण्यात अटक झाली आहे. आरोपी कृष्णा चंद्रसेन देवकाते याला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 'जीवनसाथी डॉट कॉम' या वेबसाईटवर कृष्णाने वेगवेगळ्या नावाने नोंदणी केली होती. पुण्यासोबतच ठाणे, नवी मुंबई आणि इतरही ठिकाणच्या अनेक मुलींची त्याने फसवणूक केल्याची प्राथमिक आहे. हडपसर येथील एका तरुणीला लग्नाचं अमिष दाखवून कृष्णाने तिच्याकडून पैसे घेतले होते. मात्र हा प्रकार लक्षात आल्यावर तिने पोलिसात तक्रार दिली आणि त्याचं पितळ उघडं पडलं.