पुणे | जीएसटी कायद्याअंतर्गत पहिली अटक पुण्यातील व्यक्तीला झाली आहे. या व्यक्तीने 79 कोटी रुपयांचा जीएसटी चुकवल्याचा आरोप आहे. मोदसिंह पद्मसिंह सोढा असं या व्यक्तीचं नाव असून त्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.
जीएसटी चुकवल्याप्रकरणी पुण्यातील मोदसिंह सोढा नावाच्या व्यक्तीला 26 ऑक्टोबरला मुंबईतून अटक करण्यात आली. 79 कोटींचा जीएसटी चुकवल्याप्रकरणी या व्यक्तीला 14 दिवसांची न्यायालयीन कोढडी सुनावण्यात आली आहे.
मोदसिंह सोढा हा 10 बनावट कंपन्या चालवत होता. या कंपन्यांच्या आधारे त्याने 415 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या दिल्या होत्या. या किमतीचं कोणत्याही सामानाचा व्यवहार करण्यात आला नव्हता. सर्व व्यवहार फक्त कागदोपत्रीच करण्यात आला होता. यात त्याने जवळपास 80 कोटींचा जीएसटी चुकवला होता.