Malegaon Sakhar Karkhana Election Result : माळेगाव साखर कारखाना निवडणुकीवरून शरद पवारांनी अजित पवारांनी टीका केली आहे. सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नये, मी माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांच्या निवडणुका लढलो नाही असं शरद पवार म्हणाले. ते बारामतीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्ता मारत होते. 

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामध्ये अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलला घवघवीत यश मिळाल्याचं दिसून येतंय. त्याचवेळी शरद पवारांनी त्यांच्यावर नाव न घेता टीका केल्याचं दिसून आलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः कारखान्याच्या निवडणुकीत उभे आहेत.

Sharad Pawar On Malegaon Factory Result : विरोधकांना न्याय कसा देणार?  

आपण आपल्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत, सरकारी पदावर असताना सहकारी संस्थांची निवडणूक निवडणूक लढवली नाही. विरोधकांना काही अडचण आली तर सरकारी पदावरील व्यक्ती जो कारखान्याचा प्रमुख असेल, तर तो विरोधकांना न्याय कसा देईल? असं शरद पवार म्हणाले.

माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळिराजा पॅनेल, भाजप नेते चंद्रराव तावरे- रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनेल, असे चार पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात होते. 

Ajit Pawar Won : अजित पवार विजयी

या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून ‘ब वर्ग गटातून’ उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. 102 पैकी 101 मतं वैध ठरली. त्यातील अजित पवारांना 91 मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवारांनी बाजी मारली आहे. 

Malegaon Sugar Factory Result : माळेगावमध्ये क्रॉस व्होटिंगचा फटका कुणाला? 

माळेगाव कारखाना निवडणुकीत अजित पवार ब वर्ग गटातून विजयी झाले असले तरी बाकी उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. माळेगाव, सांगवी, पणदरे गटात क्रॉस वोटिंग झालं आहे. मत पत्रिका छाननी सुरू आहे. छाननी झाल्यानंतर मतमोजणी होईल. क्रॉस वोटिंगचा फटका कुणाला बसणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.  दरम्यान अजित पवार पॅनेलचे रतनकुमार भोसले आघाडीवर आहेत. तर चंद्रराव तावरे यांचे पॅनेलचे बाबुराव गायकवाड पिछाडीवर आहेत..अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग गटामधून रतनकुमार भोसले आघाडीवर आहेत