पुणे : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी वाहतूक थांबवलेली आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तसे आदेश दिले आहेत. केवळ कोल्हापुरातूनच नाही तर सर्वच आगारातून कर्नाटकात एसटी बसची सेवा थांबवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची मात्र गैरसोय होते. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या सीमेलगतच्या जिल्ह्यातून खूप मोठ्या संख्येने प्रवासी दोन राज्यात ये-जा करत असतात. तर दुसरीकडे कर्नाटकात घडलेल्या घटनेचे पडसाद सर्वत्र दिसून येत आहेत. आता या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे लोकांमध्ये प्रचंड असा संताप हा बघायला मिळतोय. पुण्यात कर्नाटक मधील बसला काळे फासण्यात आले आहे. कर्नाटकमध्ये मराठी ड्रायव्हरवरती झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ पुणे स्वारगेट येथे काल रात्री निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटकच्या बसला काळे फासण्यात आले.

कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील बस चालकाला कन्नड येत नाही, म्हणून मारहाण करण्यात आली. बसची तोडफोड करण्यात आली याचा निषेध म्हणून स्वारगेट मध्ये काल रात्री आंदोलन करण्यात आले. यावेळी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देखील मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या. दरम्यान आणखी तणाव निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या एसटी बसेस पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबतची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी काल सांगितली आहे. 

सीमावर्ती भागातल्या नागरिकांची गैरसोय

कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चालकाला मारहाण करत तोंडाला काळं फासलं. महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येतं का? अशी विचारणा करत मारहाण करण्यात आली. त्यानंतर तणाव वाढू नये म्हणून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी वाहतूक थांबवलेली आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तसे आदेश दिले आहेत. केवळ कोल्हापुरातूनच नाही तर सर्वच आगारातून कर्नाटकात एसटी बसची सेवा थांबवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची मात्र गैरसोय होत असल्याचे समोर येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये महाराष्ट्र एसटी मंडळाच्या एसटी बससह चालकाच्या तोंडाला काळं फासल्याची घटना घडली. कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चालकाला मारहाण करत तोंडाला काळं फासलं. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येतं का? असं विचारत मारहाण करण्यात आली. एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्याने त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. चित्रदुर्ग जवळील ऐमंगळ टोल नाक्याजवळ हा प्रकार घडला. त्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याचं दिसून येत आहेत. 

स्वारगेटहून कर्नाटकला जाणाऱ्या बस बंद

कर्नाटकमध्ये महाराष्ट्रमधील एका एसटीबस चालकाला कन्नड बोलता नाही म्हणून मारहाण करून बसची तोडफोड करण्यात आली. त्याचा निषेध म्हणून काल परिवहन मंत्र्यांनी राज्यातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या बस बंद केल्या आहेत. पुण्याच्या स्वारगेट डेपोतून कर्नाटक राज्यात 6 बस दिवसभरात ये-जा करत असतात. यामधील 2 बिदर 1 गुलबर्ग 1 विजापूर 1 गाणगापूर अशा बस जात असतात. पुण्यात काल शिवसेना उबाठा गटाकडून या घटनेचा तीव्र आंदोलन करून तीव्र निषेध काल केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून पुण्याहून कर्नाटक मध्ये जाणाऱ्या बस बंद करण्यात आलेल्या आहेत. कर्नाटक मधील काही बस आलेले आहेत त्या परत पाठवण्यात आल्या आहेत.