Pune News : क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack)  14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली. वेदांत धामणगावकर (Vedanta Dhamangaonkar) असं या मुलाचं नाव आहे. पुण्यातील हडपसर (Hadapsar) भागात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळं वेदांत हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. त्यावेळी अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्यामुळं मित्रांनी त्याच्या वडिलांना कळवले. वडिलांनी तात्काळ त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयामध्ये जाण्यास सांगितले. दुसऱ्या रुग्णालयात पोहोचताच त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी वेदांतचा मृत्यू झाल्याचे घोषित केलं. हदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं वेदांतचा मृत्यू झाल्या असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.


महत्त्वाच्या बातम्या:


सावधान! बदलतं हवामान हृदयविकारासाठी धोक्याचं; संशोधन काय सांगतंय? जाणून घेऊया सविस्तर