Pune : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आज पुण्यात पंतप्रधान मोदींचा (PM Modi Visit In Pune) दौरा आहे. पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीतपणे होण्याच्या दृष्टिने तात्पुरत्या स्वरूपात विविध ठिकाणी ड्रॉप पॉइंट तसेच पार्किंगची ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत. या संबंधित आदेश पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या वतीनं जारी करण्यात आले आहेत. जाणून घ्या...
ड्रॉप पॉइंट, पार्किंगची ठिकाणे निश्चित
पुणे शहरातील दांडेकर पूल ते निलायम ब्रीज (सिंहगड मार्गावर), सावरकर पुतळा ते निलायम ब्रीज, न्यू इंग्लिश स्कूल टिळक मार्ग ते विसावा मारुती, सणस पुतळा चौक ते पूरम चौक, स. प. महाविद्यालय प्रवेशद्वार, नाथ पै चौक ते अलका चौक, अलका चौक ते भिडे जंक्शन व व्हीव्हीआयपी पार्किंग हे ड्रॉप पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. शहरातील भिडे पूल नदी पात्र (पावसाच्या परिस्थितीवर अवलंबून), निलायम टॉकीज, पाटील प्लाझा, विमलाबाई गरवारे शाळा, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, डी. पी. रोड म्हात्रे पुलाजवळ, कटारिया हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल रमनबाग, मिनर्व्हा पार्किंग मंडई, हरजीवन हॉस्पीटल सावरकर चौक, हमालवाडा पार्किंग व पीएमपीएल मैदान पूरम चौक या ठिकाणच्या जागा पार्किंगसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. समारंभाला येणाऱ्या बसेससाठी डी. पी. रोड कोथरूड तसेच शिवनेरी मार्ग, मार्केट यार्ड येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
खंडोजीबाबा चौक-टिळक चौक- सेनादत्त पोलीस चौकी- उजवीकडे वळण घेवून म्हात्रे पूल डावीकडे डी.पी. रोड, सावरकर चौकामधून येणाऱ्या बसेससाठी दांडेकर पुलावरून सरळ राजाराम पूल- उजवीकडे वळण घेवून डी. पी. रोड, सिंहगड मार्गावरून येणाऱ्या बसेस दांडेकर पूल-सावरकर पुतळा-मित्रमंडळ चौक- व्होल्गा चौक-सातारा रोड मार्केट यार्ड जक्शन वरून शिवनेरी रोड असे बसेस पार्किंग मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांनी ड्रॉप पॉईंटच्या ठिकाणी उतरावे, त्यांची वाहने निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत, असे आवाहनही पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत.पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त आज दुपारी 3 पासून वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.
1) सावरकर पुतळा चौक ते सारस बाग - पुरम चौक दरम्यान सर्व वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग :
- सिंहगड रोडवरून सावरकर चौक उजवीकडे वळण घेऊन मित्रमंडळ चौक ते व्होल्गा चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.
- मित्रमंडळ चौक कडून सावरकर चौक डावीकडे वळण घेऊन सिंहगड रोड जंक्शन वरून इच्छित स्थळी जावे.
2) जेधे चौक ते सातारा रोड प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग : टिळक रोड व शिवाजी रोडवरून येणाऱ्या वाहनांनी जेधे चौक मधून डावीकडे वळण घेऊन सेवन लव्हज चौक उजवीकडे वळण घेऊन वखार महामंडळ उजवीकडे वळण घेऊन मार्केट यार्ड जंक्शन वरून सातारा रोडला जावे.
3) सेवन लव्हज चौक ते जेधे चौक प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग : सेवन लव्हज चौक डावीकडे वळण घेवून वखार महामंडळ उजवीकडे वळून सातारा रोड वरून इच्छित स्थळी जावे.
4) व्होल्गा चौक ते जेधे चौक प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग :
- व्होल्गा चौक डावीकडे वळण घेऊन सावरकर चौक मार्गे इच्छितस्थळी जावे.
- सातारा रोडवरील वाहने मार्केट यार्ड जंक्शन येथून उजवीकडे वळण घेऊन वखार महामंडळ चौक डावीकडे वळण घेऊन सेवन लव्हज चौकामधून इच्छित स्थळी जावे.
सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन परीसर...
1) कामगार पुतळा ते शिवाजी चौक दरम्यान दोन्ही बाजुने प्रवेश बंद (रानडे पथ)
पर्यायी मार्ग :
- कामगार पुतळा ते शाहीर अमर शेख चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.
- शिवाजी चौक सरळ मंगला सिनेमा समोरून काँग्रेस हाऊस रोडवरून इच्छितस्थळी जावे.
2) तोफखाना चौक ते कोर्टाकडे प्रवेश बंद (रानडे पथ)
पर्यायी मार्ग : तोफखाना चौक डावीकडे वळण घेऊन महापालिकेसमोर खुडे चौकातून इच्छित स्थळी जावे.
आंबील ओढा परीसर
1) ना. सी. फडके चौक आणि नाथ पै चौकाचे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग :
- ना. सी. फडके चौक डावीकडे वळण घेऊन निलायम ब्रिज खालून सिंहगड रोडने इच्छित स्थळी जावे.
- नाथ पै चौक ते सरळ सिंहगड रोड जंक्शन वरून इच्छित स्थळी जावे.
2) बाबुराव घुले पथ पथावरुन टिळक कॉलेजच्या पुढे आंबील ओढा जंक्शन कडे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग :
- टिळक कॉलेज चौकातून उजवीकडे वळन घेऊन जॉगर्स पार्क रोडने शास्त्री रोडवर येऊन इच्छितस्थळी जावे.
3) साने गुरूजी पथ - टिळक रोड जंक्शन जे निलायम ब्रिज पर्यंत सर्व प्रकारचा वाहनांसाठी नो पार्किंग करण्यात आले आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहनांसाठी ड्रॉप पॉईंट तसेच पार्किंगची ठिकाणे निश्चित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याच्या दृष्टीने आज तात्पुरत्या स्वरूपात विविध ठिकाणी ड्रॉप पॉइंट व पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यासंबंधीचे आदेश पुणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी जारी केले.
ड्रॉप पॉईंट...
1) दांडेकर पूल ते निलायम ब्रीज (सिंहगड मार्गावर)
2) सावरकर पुतळा ते निलायम ब्रीज
3) न्यू इंग्लिश स्कूल टिळक मार्ग ते विसावा मारुती
4) सणस पुतळा चौक ते पुरम चौक
5) स. प. महाविद्यालय प्रवेशद्वार
6) नाथ पै चौक ते अलका चौक
7) अलका चौक ते भिडे जंक्शन
8) व्हीव्हीआयपी पार्किंग
पार्किंगची ठिकाणे..
1) भिडे पूल नदी पात्र (पावसाच्या परिस्थितीवर अवलंबून)
2) निलायम टॉकीज
3) पाटील प्लाझा
4) विमलाबाई गरवारे शाळा
5) न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड
6) आबासाहेब गरवारे महाविद्यालय
7) डी. पी. रोड, म्हात्रे पुलाजवळ
8) कटारिया हायस्कूल
9) न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग
10) मिनरर्व्हा पार्किंग मंडई
11) हरजीवन हॉस्पिटल, सावरकर चौक
12) हमालवाडा पार्किंग
13) पीएमपीएल मैदान, पुरम चौक
समारंभाला येणाऱ्या बसेससाठी डी. पी. रोड कोथरूड व शिवनेरी मार्ग, मार्केट यार्ड येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
बसेस साठी पार्किंग..
1) खंडोजीबाबा चौक - टिळक चौक - सेनादत्त पोलिस चौकी - उजवीकडे वळण घेऊन म्हात्रे पूल डावीकडे डी. पी. रोड
2) सावरकर चौकातून येणाऱ्या बसेससाठी दांडेकर पुलावरून सरळ राजाराम पूल - उजवीकडे वळण घेऊन डी. पी. रोड
3) सिंहगड मार्गावरून येणाऱ्या बसेस दांडेकर पूल - सावरकर पुतळा - मित्रमंडळ चौक - व्होल्गा चौक - सातारा रोड मार्केट यार्ड जंक्शन वरून शिवनेरी रोड.