Kirit Somaiya Pune : भाजप खासदार किरीट सोमय्या शुक्रवारी पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी सोमय्या यांनी कोविड घोटाळ्यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला. तसेच पुण्यातील आपल्यावर झालेल्या हल्ल्यावर भाष्य केलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना सोमय्या यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.  कोविड कंपनी बोगस असल्याचे आयुक्त आणि महापौरांनी मान्य केलं आहे. कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नाही. या कंपनीच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करणार आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.


कोविड कंपनी बोगस असल्याचे पुणे आयुक्तांनी मान्य केलं आहे. त्यामुळे 10 दिवसांपासून एकही डॉक्टर आणलेला नाही. या काळात अनेक रुग्णांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी पीएमआरडीएला पत्र पाठवले. तसेच कोविड कंपनीला ताबडतोब बरखास्त करा, अशी मागणी या पत्रातून केली आहे. हा रिपोर्ट आल्यानंतरही पीमएमआरडीएने 9 दिवस लागले. याकालावधीत तीन रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर पीमएमआरडीएने ही कंपनी बोगस असल्याचे सांगत करार रद्द केला. तसेच यापुढे महाराष्ट्रात या कंपनीला जागा मिळणार नाही, असे सांगितले. त्यानंतरही या कंपनीला अनेक काँट्रॅक्ट मिळाली. बीएमसीनेही तब्बल 76 कोटी रुपयांचे काँट्रॅक्ट या कंपनीला दिले. महापौर आणि आयुक्तांनी ही कंपनी बोगस असल्याचे मान्य केलं आहे. कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नाही. या कंपनीच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करणार आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले. कंपनी बोगस आहे तर कारवाई का केली नाही? असा प्रश्नही सोमय्या यांनी उपस्थित केला.


भाजप नेते किरीट सोमय्या यांना महापालिकेच्या ज्या  पायऱ्यांवर  शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. त्याच पायऱ्यांवर भाजपने सोमय्या यांचा सत्कार करण्यात आला.  सोमय्या म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष जगदीश मुळीक यांचे मनापासून आभार मानतो.  उद्धव ठाकरेंच्या गुंडांनी शनिवारी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माझे आव्हान आहे की, तुम्ही ज्या कोव्हिड कंपनीला कंत्राट दिलं. त्या कंपनीचा मालक कोण आहे उद्धव ठाकरेंनी सांगावे. त्या कंपनीचा मालक केईएम रुग्णालयाच्या मागे असणार चहावाला आहे. कोरोनाकाळात महाविकासआघाडी सरकार पुणेकरांच्या जीवाशी लोकांशी खेळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या बेनामी कंपनीवर कारवाई केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. 


दरम्यान, पुणे महापालिकेत दररोज जवळपास  हजार नागरिक विविध कामांच्या निमित्ताने येत असतात.मात्र आज दुपारी 2 वाजल्यापासून नागरिकांना प्रवेश नाकारल्याने बाहेर ताटकळत उभे राहावे लागले. तर अनेकांची कामे देखील झाले नाही.यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.