Vasant More : मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाचे   (Vasant More) बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून 30 लाखांची खंडणी अज्ञातांनी मागितली आहे. खंडणी नाही दिल्यास गोळ्या झाडून जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून धमकी दिली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत मोरेंच्या मुलाला धमकी आल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.


वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांचं बनावट विवाह सर्टिफिकेट तयार करत खंडणीची मागणी केली आहे. अल्पिया शेख या महिलेच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज करत 30 लाख रुपयाची खंडणी मागितली आहे. हे पैसे पुण्यातील खराडी येथील युवान आयटी थांबलेल्या इनोवा कारमध्ये ठेवा, असा व्हॉट्सअपवर मेसेज आला. तसेच विवाह सर्टीफिकेट व्हायल करण्याची धमकीदेखील दिली आहे. खंडणी न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. रूपेश फार कोणात नसतो तरी देखील त्याला धमकी आल्याने वसंत मोरेंची चिंता वाढली आहे.


याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वडगाव गावाच्या ग्रामसेवकाच्या सहीचे मॅरेज सर्टिफिकेट असल्याचे आले आहे. त्यामुळे आता पुणे आणि औरंगाबादमध्ये या प्रकरणाचा तपास होणार आहे.
 


काही दिवसांपूर्वी 'सावध रहा' अशी धमकी


काही दिवसांपूर्वी रुपेश याला सावध रहा अशी धमकी आली होती.  रुपेश याच्या गाडीवर धमकीची चिठ्ठी लावण्यात आली होती. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कात्रज परिसरात भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता. या सगळ्या मेळाव्याचं नियोजनाचं काम रुपेश याच्याकडे सोपवण्यात आलं होतं. त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायपरमध्ये  "सावध रहा रुपेश"  आशी चिठ्ठी लावून ठेवली.   रात्री घरी आल्यावर वसंत मोरे यांनी पाहिली.


घडलेल्या प्रकारासंर्भात वसंत मोरेंनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली होती.  मुलगा म्हटले की प्रत्येक बापाचा अभिमान असतो. आमचेही अगदी तसंच आहे, पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही. राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही. गेले दोन तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हते, पण आज ठरवले तुमच्या सोबत बोललंच पाहिजे. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली. त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायपर मध्ये "सावध रहा रुपेश" अशी चिठ्ठी लावून ठेवली होती, असं त्यांनी सांगितलं होतं.