पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग रोखून धरणाऱ्या 150 ते 175 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलिसांनी ही कारवाई केली.
मराठा मोर्चातील आंदोलकांनी एक्स्प्रेस वेवरील उर्से टोल नाक्यावर दोन्ही दिशेचा मार्ग तब्बल सहा तास रोखला होता. याप्रकरणी 150 ते 175 आंदोलकांवर कारवाई होणार आहे. रस्ता अडवणे, जमाव जमवणे तसेच नव्यानेच लागू झालेला हायवे अॅक्ट 8 ब नुसार तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
सकल मराठा क्रांती मोर्चाकडून सकाळी साडे दहा वाजता द्रुतगती मार्ग रोखला गेला. टाळ मृदुंगाचा गजर करत, भजन-कीर्तनातून सरकारचा निषेध करण्यात आला. ही रास्ता रोकोची सुरुवात होती. हे आंदोलन पहिल्या अर्ध्या तासात संपलं. मग असेच टप्याटप्याने आंदोलकांची ये जा सुरूच होती. अशात दोन वाजले, तोपर्यंत तब्बल 700 ते 800 चा जमाव निदर्शने नोंदवून निघून गेला होता.
मात्र शेवटचा 150 ते 175चा जमाव रस्त्यावरून हटण्यास तयार नव्हता. पोलिसांकडून वारंवार आवाहन केलं जात होतं. कसाबसा हा जमाव साडेचारला हटला. तोपर्यंत दोन्ही दिशेने वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. शेकडो प्रवासी अडकून पडले होते. तब्बल सहा तासाने या सर्वांची सुटका झाली. त्यामुळे पोलोसांनी शेवटच्या 150 ते 175 च्या जमावावर गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
पुण्यातील तोडफोडप्रकरणी 185 जण ताब्यात
मराठा मोर्चाने पुकारलेल्या बंददरम्यान पुण्यात झालेल्या तोडफोडीप्रकरणी, पोलिसांनी 185 जणांना ताब्यात घेतलं आहे, तर 81 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं.आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली.माध्यमांच्या प्रतिनिधींनाही यावेळी वार्तांकन करण्यापासून रोखण्यात आलं. त्यानंतर चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. पोलिसांनी चांदणी चौक दगडफेक प्रकरणी 83, जिल्हाधिकारी कार्यालय राड्याप्रकरणी 5 महिलांसह 76, डेक्कन येथे रास्तारोको करणारे 21 असे एकूण 185 जणांना ताब्यात घेतलं.
संबंधित बातम्या
पुण्यातील तोडफोडप्रकरणी 185 जण ताब्यात
चांदणी चौकात राडा, आंदोलकांची दगडफेक, पोलिसांचा लाठीमार
18-20 वयाच्या मुलांनी तोडफोड केली: पुणे जिल्हाधिकारी
महाराष्ट्र बंद : पुण्यात आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड
एक्स्प्रेस वे रोखणाऱ्या 150 ते 175 आंदोलकांवर गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Aug 2018 02:24 PM (IST)
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग रोखून धरणाऱ्या 150 ते 175 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलिसांनी ही कारवाई केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -