पुणे : लोणावळ्यात (Lonavala Rain) यावर्षीचा रेकॉर्डब्रेक पाऊस कोसळला आहे. गेल्या 9 तासात 145 मिलिमीटर पाऊस कोसळला असून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. यावर्षीचा हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला, असल्याने लोणावळ्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. लोणावळ्यात पावसाचा जोर काल पासून कायम आहे. उद्या आणि परवा ही अधिकचा पाऊस बरसेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळं शहरातील बारावी पर्यंतच्या सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलीये. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळेंनी सुट्टी देण्याचा निर्णय घेतलाय.
लोणावळ्यात अवघ्या नऊ तासांत 145 मिलीमीटर पाऊस बरसला आहे. आज सकाळी 8 ते सायंकाळी 5 दरम्यानच्या पावसाची ही नोंद आहे. तर काल दिवसभरात 275 मिलिमीटर पाऊस कोसळला होता. याच पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय आतापर्यंत लोणावळ्यात 2601 मिलिमीटर पाऊस झाला आहे. जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 101 मिलिमीटरने जास्त आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2501 मिलिमीटर पाऊस झाला होता.
मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र दिसून येत आहे. पुणे(Pune Rain) जिल्ह्यातील भोर, वेल्हा या भागात 100 मिलिमीटरच्या वरती पावसाची नोंद झाली आहे. तर मावळ आणि भीमाशंकर परिसरात 200 मिलिमीटरच्या वरती पावसाची नोंद झाली आहे. कार्ला, मळवली, सदापुर या भागामध्ये इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरले आहे. देवले ते मळवली या रस्त्यावर जवळपास दीड ते दोन फूट पाणीच असल्याने नागरिकांना या पाण्यामधून वाट काढत प्रवास करावा लागत आहे.
लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी
मुसळधार पाऊस(Rain)आणि हिरवा निसर्ग पाहण्यासाठी आणि वर्षाविहारासाठी लोणावळ्यात(Lonavala)पर्यटकांचा ओघ वाढला आहे. शहर परिसरात असलेले धबधबे आणि लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. विक एंडला या भागामध्ये मोठ्या पर्यटक येत असतात. मुसळधार पाऊस असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
हे ही वाचा :
Lonavala Rain Update: लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; मळवलीमध्ये बंगल्यात अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यात यश