लोणावळा, पुणे : राज्यातील अनेक महाविद्यालयात (Lonavala) रॅगिंगचे प्रकार घडत (Pune Crime news) असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. रॅगिंग थांबवण्यासाठी महाविद्यालयाकडून प्रयत्न केले जातात मात्र तरीही रॅगिंगचे (College Ragging In lonavala) प्रकार सुरुच आहे. यात रॅगिंगमुळे एका दिव्यांग विद्यार्थीनीला ब्रेन स्ट्रोक (Brain Strock) आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणवळ्यातील नामांकित महाविद्यालयात हा रॅगिंगचा प्रकार घडला आहे. ब्रेन स्ट्रोक आल्याने विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर पिंपरी- चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
लोणवळ्यात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी BBA/ CA च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. कल्याणी गजानन निकम असं ब्रेन स्ट्रोक आलेल्या विध्यार्थ्यांनीचे नाव आहे. मुलींच्या वसतिगृहात पीडित कल्याणी राहण्यास होती, गेल्या दोन ते तीन महिन्यापासून तिच्यावर सतत रॅगिंग केली जायची, बाथरूममध्ये कोंडून ठेवलं जायचं, तिच्या पाठीमागे चाकू घेऊन धावायच्या, दोन वेळा चाकू लागल्याचं कल्याणीच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.
या गंभीर घटने प्रकरणी पालकांनी वॉर्डनला तक्रार ही केली, मात्र यात काही फरक पडला नाही, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती. अखेर रॅगिंग सहन न झाल्याने कल्याणीला ब्रेन स्ट्रोक आलाय, तिच्यावर पिंपरी- चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरु आहे. ज्या मुलींनी रॅगिंग केलीय त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.
दोन ते अडीच महिन्यांपासून सतत रॅगिंग
कल्याणीसोबत मागील दोन ते अडीच महिन्यांपासून तिच्या रुममेट रॅगिंग करत होत्या. यामुळे तिला मानसिक त्रास व्हायचा. यासंदर्भात तिने कुटुंबियांना माहिती दिली होती. रुममेट चाकू घेऊन मागे लागल्याचंदेखील तिने कुटुंबियांना सांगितलं होतं. हा त्रास अनावर झाला आणि याच मानसिक धक्क्यामुळे तिला थेट ब्रेन स्ट्रोक आला.
रुममेटवर कडक कारवाई करा; कुटुंबियांची मागणी
रुममेटने दिलेल्या त्रासामुळे कल्याणीला ब्रेक स्ट्रोक आला. कल्याणीची प्रकृती गंभीर आहे. ती कोमात जाण्याची शक्यता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असल्याचं तिच्या भावाने सांगितलं आहे. तिला झालेला त्रास पाहता आणि हा सगळा प्रकार पाहता कल्याणीच्या कुटुंबियांनी या मुलींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे.
इतर महत्वाची बातमी-