पुणे : शहरातील बुधवार पेठ परिसरात सहा जणांनी केलेल्या खुनी हल्ल्यात शिवसेनेच्या माजी दिवंगत नगरसेवकाच्या मुलाचा मृत्यू झाला आहेय दीपक मारटकर, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. पुणे शहराच्या मध्यवस्तीत हा प्रकार घडल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. रात्रीचे जेवण करून दीपक बाहेर आले असता आधीच दबा धरून बसलेल्या पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकू आणि कोयत्याने खुनी हल्ला चढवला. डोक्यावर पाठीवर छातीवर सपासप वार करून हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या दीपक यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
पैशाच्या हव्यासापोटी मित्राला पत्नीवर बलात्कार करण्यास मदत; आरोपी पती गजाआड
दरम्यान घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीचा शोध घेण्यासाठी त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून तीन दुचाकीवरून सहा तरुण आलेले दिसत आहे. या सर्व तरुणांनी तोंडाला मास्क लावल्याने सध्या त्याची ओळख पटली नाही.
राजकीय वादातून हत्या झाल्याचा शक्यता
या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. राजकीय मतभेदातून ही हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Pune Candle March | हाथरस घटनेच्या निषेधार्थ पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कॅंडल मार्च