पुणे : झपाटलेपण, समपर्ण भावना आणि सकारत्मकता या त्रिसुत्री सुत्रावर शालेय शिक्षणाचा भर होता. आज जे काही यश संपादन करू शकलो आहे, ते त्यामुळेच, असे गौरवउद्गार नवनियुक्त भारतीय लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी आपल्या 'ज्ञान प्रबोधिनी प्रशालेबाबत कृतज्ञता व्यक्त करताना काढले. ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.


अभियांत्रिकी ड्राईंग हा माझा आवढता छंद आणि विषय आहे. त्यामुळे कोणत्याही समस्येकडे तीन कोनातून पाहण्याची सवय शालेय जीवनापासूनच लागली, त्याचा पुढील वाटचालासाठी खुप उपयोग झाला. आयुष्यात ज्या विषयात रस आहे, त्यातच काम करा हे आम्हाला शाळेने शिकविले. माझे आजचे यश हे प्रशालेने आमच्या जडणघडणीसाठी केलेल्या सांघिक प्रत्यत्नांचे यश आहे. सोबतच झपाटलेपण, समपर्ण भावना आणि सकारत्मकता या त्रिसुत्री सुत्रावर शालेय शिक्षणाचा भर असल्याने यश संपादन करू शकल्याचे मनोज नरवणे यांनी सांगितले.

ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल पटांगण, टिळक रोड, पुणे येथे माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक आणि ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त डॉ. धनंजय केळकर यांचा ज्ञान प्रबोधिनीच्या स्थापनेवेळी प्राचार्य असलेले यशवंतराव लेले, वामनवराव अभ्यंकर विशेष सत्कार करण्यात.

लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख 
जगातील बलाढ्या अशा गणल्या जाणाऱ्या भारतीय लष्कराचे नेतृत्व आता मनोज नरवणे करणार आहेत. सुरुवातीचे शिक्षण त्यांनी पुण्यातील ज्ञानप्रबोधीनी शाळेतून त्यांनी घेतले आहे. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. पुण्यातील एनडीएमधून त्यांनी लष्कराचे शिक्षण घेतल्यानंतर 1980 साली त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. शीख लाईट इनफंट्रीमध्ये सुरुवातीला त्यांनी काम केले. बिपीन रावत हे सुद्धा याच रेजिमेंटचे जवान आहेत. मनोज नरवणे यांच्या रुपाने जवळपास 33 वर्षानंतर मराठी माणसाकडे पुन्हा एकदा लष्कराचे नेतृत्व आले आहे. 13 लाख अधिकाऱ्यांचा फौजफाटा असणाऱ्या लष्कराचे प्रमुख म्हणून आता लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे काम पाहणार आहेत. नरवणे हे देशाचे 28 वे लष्कर प्रमुख असतील.

हेही वाचा - महाराष्ट्राचे सुपूत्र मनोज नरवणे होणार लष्करप्रमुख

Army chief | महाराष्ट्राचे सुपूत्र मनोज नरवणे होणार लष्करप्रमुख | ABP Majha