पुणे : समलैंगिकांच्या हक्कांसाठी आज पुण्यात प्राईड रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीमधे पुणे-मुंबईसोबतच देशभरातील शहरांमधील हजारो समलैंगिक आणि तृतीयपंथीय सहभागी झाले होते.

पुण्यातील जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरुन ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश होता.

आपला समाज अजूनही समलैंगिकांना उघडपणे स्वीकारण्यास तयार नाही आणि त्यामुळे राजकीय पक्षही समलैंगिकांच्या हक्कांबाबत उदासीन आहेत अशी खंत रॅलीचे आयोजक आणि समपथिक संस्थेचे सर्वेसर्वा बिंदूमाधव खिरे यांनी व्यक्त केली.