पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Pune) यांनी आज पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. विद्यार्थ्यांनी पवारांना अनेक प्रश्नांची विचारणा केली. शरद पवारांनीही त्यांच्या परीने उत्तरं दिली. यावेळी लेशपाल जवळगे (Leshpal Javalge ) या तरुणानेही शरद पवारांना प्रश्न विचारला. लेशपाल जवळगे हा तोच तरुण आहे, ज्याने मागील वर्षी पुण्यात एका तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्यातून तिला वाचवलं होतं. लेशपालने शरद पवारांना एमपीएससी आयोगाच्या कारभारावरुन प्रश्न विचारला.
लेशपाल जवळगेचा शरद पवारांना प्रश्न
लेशपाल म्हणाला, "स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय, मी माढा तालुक्यातील आहे, विद्यार्थ्यांचे खूप प्रश्न आहेत. त्यातील एक प्रश्न आहे मी सांगतो, लोकसभेच्या निवडणुकाबाबत शेंबड्या पोराला माहिती होतं की या निवडणुका एप्रिलमध्ये होणार आहेत. पण एमपीएससी आयोगाला माहिती नव्हतं का? मग त्यांनी 28 एप्रिल ही तारीख दिलीच कशी?
पुढचा प्रश्न यूपीएससीने 26 मे तारीख मागची पंचवार्षिक गृहित धरून जाहीर केली. त्यानंतर ज्यावेळी आचारसंहिता लागली एमपीएससीने पीएसआय, एसटीआयसाठी जी तारीख दिली होती, तीच तारीख एमपीएससीला गृहित न धरता 16 जून ही जाहीर केली. त्यामुळे MPSC कोणाच्या दबावापुढे काम करतेय हे समजायला मार्ग नाही. पुढच्या तारखा हे टाळतात, हे असेच आम्हाला दुर्लक्षित करणार असतील, तर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे, त्यांनी इतिहास, भूगोल वाचला, राजकारण, अर्थकारण त्यांना कळतं. त्यांनी क्रांती वाचली आहे, यांनी भगतसिंग वाचला आहे. हे जर आम्हाला असंच दुर्लक्ष करणार असतील तर आमच्यातील भगतसिंग जागा होईल, ते यांना सोसणार नाही"
शरद पवार यांचं उत्तर
लेशपालच्या प्रश्नाला शरद पवार यांनी उत्तर दिलं. शरद पवार म्हणाले, "निवडणूक तारखा निवडणूक आयोग ठरवतं. याचा विचार त्यांनी केला पाहिजे.तरुण एक एक दोन दोन वर्ष अभ्यास करत आहेत,सगळा बोजा असतो,पालक त्रास सहन करून तयारी दर्शवत असतात. अमुक महिन्यात परीक्षा होऊन जातील,चुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने ठरवले जात असल्याने,त्या सर्व विद्यार्थ्यांचा खर्च वाढतो, वाया जातो, नैराश्य येतं. त्यामुळे शहाणपणाने असे कार्यक्रम निवडणूक आयोगाने आखणे गरजेचे आहे"
शरद पवारांना अन्य विद्यार्थ्यांचे प्रश्न
प्रश्न : महिला सक्षमीकरणासाठी आहे,राजकारणमध्ये महिलांना निर्णय प्रक्रियेत ठेवलं जात नाही, असं का,?
शरद पवार उत्तर - कर्तुत्व दाखवायची संधी दिली तर महिला कुठल्याही क्षेत्रात कर्तृत्व दाखवू शकतात,मानसिकता बदलली पाहिजे,मुलींना संधी मिळाली पाहिजे
मी एकदा परदेशात गेल्यावर ,मला परदेशात महिला अधिकारी दिसल्या. मी परत देशात आल्यावर मी म्हटलं संरक्षण विभागात महिला हव्यात,मी अधिकारी निर्णय सांगितला की १० टक्के महिला हव्यात. या देशात सीमेवर लढावू विमान चालवण्याचा अधिकार महिलांना आहे. मुंबई हायकोर्ट ब्रांच पुण्यात आल्यावर अनेक लोकांना संधी मिळेल,याचा पाठ पुरावा केला पाहिजे.
प्रश्न : एमपीएससी यूपीएससी परीक्षा तारखा बदलल्या, कोणाच्या दबाव आणि बदलल्या,हे सरकार आम्हाला दुर्लक्ष केलं जाते का?
शरद पवार : निवडणूक तारखा निवडणूक आयोग ठरवत,याचा विचार त्यांनी केला पाहिजे,तरुण एक एक दोन दोन वर्ष अभ्यास करत आहेत,सगळं बोजा असतो,पालक त्रास सहन करून तयारी दर्शवत असतात,अमुक महिन्यात परीक्षा होऊन जातील,चुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने ठरवले जात असल्याने,वाया जात नाही पण खर्च वाढतो त्यामुळे शहाणपणाने असे कार्यक्रम आयोगाने आखणगरजेचे आहे
प्रश्न : Mpsc ने शारीरिक चाचणी घेतली ती जाचक होत्या,त्याची तयारी केली,आम्हला वेळ कमी दिला जातो. शारीरिक चाचणीसाठी वेळ वाढवून देण्यात यावा
पवार : तुमची मागणी १०० टक्के बरोबर आहे,आल्यापासून मी ऐकत आहे.याअगोदर एक आंदोलनासाठी रात्री १० वाजता आलो. मी राज्य सरकारची भेटीगाठी केली,यात एक गोष्ट गंभीर दिसतेय.याकडे सगळ्या गोष्टीकडे यंत्रणाकडून शहाणपणा काही होत नाही. काही परीक्षा रद्द होते,ती परत घेतली जाते हे गैर आहे.असं होता कमा नये.एक सतर्क यंत्रणा करणं गरजेचं आहे. निवडणूक संपली की एक यंत्रणा उभी करू.त्रास होऊ नये याची एक काळजी घेऊ.
प्रश्न : फडणवीस यांनी पोलीस भरती लेट काढली आहे.यावर काही उत्तर मिळतं नाही, वय वाढवून देण्याची मागणी केली
शरद पवार : राजस्थानात वय मर्यादा वाढवून देऊ शकतं तर आपलं सरकार का नाही करत? सगळे प्रश्न सुटतील असं नाही,पण आपले प्रश्न मांडू आणि आपल्या प्रश्नाची सुटका करून घेऊ
प्रश्न : एमपीएससी कडे सर्व परीक्षा द्या,फडणवीस यांना जमत नसेल तर एमपीएससी विद्यार्थ्यांकडे द्या,पण सगळे एमपीएससीकडे सगळं द्या. एमपीएससी जागा वाढवली पाहिजेत. पुरोगामी चळवळीतील लोकांना सत्ता आल्यावर का विसरले जातेय़
पवार : 86 टक्के लोक आपल्यात बेकार आहेत,मोदी यांनी आश्वासनं दिल दरवर्षी 2 कोटी नोकरी देऊ,तर 20 कोटी नोकरी हव्या होत्या,पण गेले नऊ वर्षात किती लोकांना नोकरी मिळाली तर 7 लाख मुलांना नोकरी मिळाली.
राज्यसेवा जागा वाढवल्या पाहिजेत. भ्रष्टाचाराबाबत नविन कायदे करावे. फी कमी करावी. कंत्राटी नोकरी पद भरती बंद केली पाहिजे. ज्या सामजिक संस्था केल्या आहेत त्याला सक्षम केलं पाहिजे,यातून लोक तयार केले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये उद्योग वाढवले पाहिजे, कारखानदारी वाढवली पाहिजे. सामंजस्यांनी प्रश्न सोडवू,मी तुमच्या बरोबर आहे.
VIDEO : लेशपाल जवळगेचा शरद पवारांना प्रश्न
संबंधित बातम्या
MPSC Exam: मोठी बातमी: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, परीक्षा पुढे ढकलली