पुणे: पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या (Pune Leopard Attack) हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे १० वर्षांच्या चिमुरडीवर बिबट्याने (Pune Leopard Attack) झडप घातली. या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काव्या महेंद्र वाकचौरे (वय १०, रा. वाकचौरे मळा, ओतूर) ही मुलगी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे.(Pune Leopard Attack)

Continues below advertisement

Pune Leopard Attack: नेमकं काय घडलं ?

आज (गुरुवारी, ता २१) सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास काव्या ही आपल्या बहिणीसोबत घराजवळ मॉर्निंग वॉक करत होती. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली. काव्याने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. नागरिकांचा गोंधळ आणि आरडाओरडा ऐकताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. या हल्ल्यात काव्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून तिला तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 मात्र, ओतूर येथील १४ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय अद्यापही सुरू न झाल्याने जखमी मुलीच्या उपचारासाठी मोठी हेळसांड झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोक सखाराम अहिनवे तसेच मुलीच्या पालकांनी वनविभागाला दिल्यानंतर वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, वाकचौरे मळा परिसरात वारंवार बिबट्यांचा वावर वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास ६ वाजण्याच्या वेळेस काव्या आपल्या बहिणीसोबत घराजवळ मॉर्निंग वॉक करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली. मुलीच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरड करीत घटनास्थळी धाव घेतल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. या हल्ल्यात काव्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून तिला तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.