पुणे: पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुध्दाने दहशत माजवली आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर पूर्ववैमनस्यातून (Pune Crime News) गोळ्या झाडून कोयत्याने वार करण्यात आले. हा घटना काल (बुधवारी) घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात राजर्षी शाहू बँकेसमोरील एका हॉटेलसमोर ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने आंदेकर टोळीच्या चार जणांना ताब्यात घेतले आहे.(Pune Crime News)
अक्षय ऊर्फ बाळा बापू म्हस्के (वय २६, रा. श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ, सर्व्हे क्रमांक २५, आंबेगाव पठार, धनकवडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. आंदेकर खून प्रकरणात मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आकाशचा गोळीबार केलेला अक्षय म्हस्के हा भाऊ आहे. अक्षय हा पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात बुधवारी सकाळी नाश्ता करण्यासाठी आला होता.(Pune Crime News)
राजर्षी शाहू बँक चौक येथे तो थांबला होता. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी अक्षयवर पिस्तुलातून गोळी झाडली. एक गोळी अक्षयच्या पायाला लागली त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार देखील केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. 'प्राथमिक चौकशीत अक्षय म्हस्के याच्यावर वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून सर्व शक्यता गृहित धरून पोलिस तपास सुरू आहे(Pune Crime News)
Andekar vs Komkar : काय आहे या प्रकरणाची पार्श्वभूमी ?
पुण्यातील नाना पेठेतील डोके तालीम चौकात १ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा वर्चस्व वाद तसेच संपत्तीच्या वादातून पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आलेला होता. या प्रकरणी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक करण्यात आलेली होती. त्यानंतर आंदेकर टोळीने वनराज याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष याचा सोसायटीमध्ये गोळीबार करून गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी ५ सप्टेंबर २०२५ रोजी खून करण्यात आला होता.
विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली होती. आयुष कोमकर हा आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा नातू होता. कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह साथीदारांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर १ नोव्हेंबर २०२५ रोजी आंदेकर टोळीने बदला घेण्यासाठी आंदेकर खून प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ गणेश किसन काळे (वय ३२, रा. येवलेवाडी, कोढवा) याचा कोंढव्यातील खडी मशीन चौकामध्येच गोळ्या घालून खून केला होता. गणेश काळे हा देखील रिक्षाचालक होता. वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींना मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून दिल्याप्रकरणी समीर काळे, आबा खोंड, आकाश म्हस्के, संगम वाघमारे यांना अटक करण्यात आली होती.
