Pune Kiran Sali: पुणे जिल्हातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत. या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटाकडून नवे पद देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या नियुक्तीची घोषणा केली आहे. किरण साळी, विजय शिवतारे
रमेश कोंडे, अजय भोसले, नाना भानगिरे या पदाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या पदावर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 
रमेश कोंडे यांची पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदी, नाना भानगिरे यांची शहरप्रमुखपदी, अजय भोसले यांची जिल्हा व शहर सह-संपर्कप्रमुखपदी तर किरण साळी यांची युवासेना सचिवपदी नियुक्ती केली आहे. युवासेनेचे राज्य सचिव वरूण सरदेसाई यांची युवासेनेतून हकालपट्टी केल्याने ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या जागी आता किरण साळी यांची युवासेना राज्य सचिव पदी निवड करण्यात आली आहे. 


किरण साळी हे माजी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांचे निकटवर्तीय आहे. ते गेले अनेक वर्ष झाले शिवसेनेच काम करत आहेत.  साळी यांनी युवासेनेचे राज्य सहसचिव म्हणून काम केलं  होतं. त्यांनी युवासेनेतून त्यांनी अनेक वर्ष काम केलं होतं. त्यामुळे त्यांच्या नावाची वर्णी लावण्यात आली आहे. ठाकरे सरकारला धक्का देण्यासाठी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याच्या चर्चा आहेत.


माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या हकालपट्टीची घोषणा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून करण्यात आली होती. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आलं होतं. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका शिवतारेंवर ठेवला होता.  उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालत नाहीत. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचे विचारावर चालण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळं मी शिंदे गटासोबत गेल्याचे शिवतारेंनी सांगितले होते. शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश घेतला होता. यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला पुणे माहानगरपालिकेत नगरसेवक मिळण्याची शक्यता आहे.