मुंबई : 14 एप्रिलपासून सराफा दुकानं उघडण्याचा निर्णय महाराष्ट्र सराफ असोसिएशनने घेतला आहे. साधारणपणे 38 दिवसांपासून सराफाची दुकानं बंद असल्यामुळे ग्राहक त्रस्त होते.
लग्नसराई आणि लोकांची मागणी लक्षात घेता दुकानं सुरु करणाऱ्या निर्णय महाराष्ट्र सराफ असोसिएशनने घेतला आहे. उद्या राज्य सरकारला प्रस्ताव देण्यात येणार आहे. सराफा दुकानं पुन्हा खुली होण्याच्या निर्णयामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने एक टक्का अबकारी कर मागे घ्यावा, या मागणीसाठी सराफांचा संप सुरु होता.
दरम्यान प्रस्ताव मंजूर न झाल्यास 24 तारखेपासून पुन्हा दुकानं बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोनेखरेदीचा गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकला होता, मात्र लग्नसराईच्या तोंडावर आलेल्या या निर्णयामुळे सोने खरेदीदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.