जुन्नर, पुणे : पुणे जिल्ह्या बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये   (Leopard Attack ) वाढ झाली आहे. त्यातच अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर दिसत आहे. अशातच एक घटना समोर आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.  आयुष शिंदे असं या मुलाचं नाव आहे.  जुन्नर येथील उंब्रज येथे सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. आयुष सचिन शिंदे हा आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना शेजारच्या उसाच्या शेतातून बिबट्या बाहेर आला आणि त्याने हल्ला केला. आयुषच्या आई-वडिलांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या जखमी मुलाला सोडून पळून गेला.


या हल्ल्यात आयुषच्या मानेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर आळे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुष आणि त्याच्या कुटुंबीयांची रुग्णालयात भेट घेऊन हल्ल्याची माहिती गोळा केली. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा दावा आयुष शिंदेच्या वडिलांनी केला आहे.


बिबट्यांचे हल्ले वाढले!


पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर आणि हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीआंबेगाव तालुक्यातील थोरांदळे फुटाणे मळा येथे धनगर समाजाच्या सात महिन्याच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेत मुलाच्या आईने बिबट्यास जोरदार प्रतिकार करत आपल्या मुलाचं प्राण वाचवलं होतं. आंबेगाव येथील फुटाणे मळा येथे सुखदेव फुटाणे यांच्या शेतात धोंडीभाऊ करगळ या मेंढपाळाचा वाडा बसलेला होता. मेंढपाळ धोंडीभाऊ करगळ यांची पत्नी सोनल करगळ ही तिच्या सात महिन्याचा मुलगा देवा याला घेऊन वाड्याच्या शेजारीच बाहेर झोपली होती. रात्री दोन वाजता सुमारास ती झोपली असताना मुलाचा हात अंथरुणाबाहेर पडला होता. त्यावेळी बाजूलाच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने मुलाचा हात तोंडात धरत ओढण्याचा प्रयत्न केला होता.


नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण


मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहेत. पाण्याच्या शोधात हे बिबटे वस्तीत शिरत असावेत असा अंदाज आहे. मात्र या बिबट्यांच्या अशा वावरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.


इतर महत्वाची बातमी-


जलने वालो को खबर करदो अब हम ट्रेंडिंग मे आ रहै हैे!Murlidhar Mohol : 'जलने वालो को खबर कर दो, अब हम ट्रेंडिंग मे आ रहै है'; मुरलीधर मोहोळांचा रोष कुणावर?