Jejuri Shashan Aplya Dari : पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे (Jejuri Shashan Aplya dari) होणाऱ्या शासन (Jejuri) आपल्या दारी कार्यक्रम पार पडत आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील नागरिकांना खास एसटी बसेस करुन कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यात आलं आहे. मात्र यापैकी अनेकांना आपल्याला इथे का आणलं आहे?, हेच माहिती नसल्याच दिसून आलं. आपल्याला नक्की कोणत्या योजनेचा लाभ मिळणार आहे हेच अनेकांना सांगता आलं नाही.शासनाच्या कार्यक्रमाला खोटी गर्दी आणली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चार वेळा हा कार्यक्रम वेगवेगळ्या कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला होता. मात्र अखेर आज हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी 451 बसेसच्या माध्यामतून 18 हजाराहून अधिक नागरिक किंवा लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली आहे आणि परत जाताना प्रत्येकाला फळझाड मिळणार आहे. अनेक गावातील ग्रामपंचायतीकडून नागरिकांना फोन आणि मेसेज करुन कार्यक्रमाला जायचं असल्याचं सांगून जेजुरीत घेऊन आले आहे. अनेक नागरिकांना त्यांना नेमका कोणता लाभ मिळणार आहे किंवा जेजुरीत नेमका कशाचा कार्यक्रम आहे. याची अनेक नागरिकांना माहिती नाही आहे.
या कार्यक्रमासाठी अनेक महिलांनादेखील आणण्यात आलं आहे. सकाळपासून महिला शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी आल्या आहेत. त्यांना गावातील ग्रामपंचायतीकडून नागरिकांना फोन आणि मेसेज आला आहे आणि त्यांच्यासाठी बसची सोय देखील करण्यात आली आहे. मात्र या महिलांनादेखील हा कार्यक्रम कशासाठी आहे, हे माहिती नाही आहे. महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात येणार होते. त्यात पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच जेजुरीत हा कार्यक्रम होत आहे.
चारवेळा हा कार्यक्रम पुढे ढकलला गेल्याचा सर्वात मोठा फटका हा विद्यार्थ्यांना बसल्याचं बोललं जात आहे. प्रवेश प्रक्रिया सुरु असताना उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअरचे दाखले, आर्थिक दुर्बल गटाचे दाखले, यासांठी विद्यार्थ्यांची प्रचंड धावपळ सुरु असते. पण पुण्याच्या तहसील कार्यालयात पडलेल्या चेहऱ्याने शेकडो विद्यार्थी आणि पालक अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्या पाहालया मिळत होत्या. आज कार्यक्रमात अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या-
Ajit Pawar : जयंत पाटलांनी अमित शाहांची भेट घेतली का?; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं...