Jejuri Shashan Aplya Dari : अखेर पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे (Jejuri Shashan Aplya Dari) होणाऱ्या शासन (Jejuri) आपल्या दारी कार्यक्रमाला मुहूर्त लागला. 7 ऑगस्ट रोजी जेजुरी येथे होणार शासन आपल्यादारी कार्यक्रम होणार आहे. चारवेळा आधी शासन आपल्यादारी कार्यक्रम रद्द झाला होता. अनेक लाभार्थ्यांना लाभाची वाट पहावी लागली होती. सोमवारी रोजगार मेळावादेखील आयोजित करण्यात आला आहे


'शासन आपल्या दारी' अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे 7 ऑगस्ट  रोजी सकाळी 9  वाजता जेजुरीत आयोजन करण्यात आले आहे.


चार वेळा तरी झाली होती पण...


काही प्रमाणात या कार्यक्रमाची तयारी झाली होती. या तयारीसाठी सगळा खर्च करण्यात आला होता. महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात येणार होते. त्यात पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच जेजुरीत हा कार्यक्रम होणार होता. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. बदलत्या राज्याच्या समीकरणानंतर हा कार्यक्रम फार महत्त्वाचा होता. त्यात जेजुरीत म्हणजेच पवारांच्या बालेकिल्ल्यात होणार असल्याने सगळ्यांनाच उत्सुकता होती. मात्र रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. 


नोकरीच्या विविध संधी 


या महारोजगार मेळावाद्वारे विविध पदांकरिता वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांना नोकरीची विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बेरोजगार उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने, त्यांच्यासह इतर सर्वच इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांच्या अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवा, असं आवाहन करण्यात आलं आहे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, आवश्यकतेनुसार संक्षिप्त परिचयासह अर्ज आणि आधारकार्डच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. खाजगी क्षेत्रातील या विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जास्तीत जास्त नोकरीइच्छूक उमेदवारांनी 7 ऑगस्ट  रोजी सकाळी 9 वाजता. महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले आहे. 


 हेही वाचा-


Devendra Fadnavis : आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधली, अशांना उत्तर देऊन काय फायदा? देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर