Release of water from Khadakwasla dam : पुणेकरांसाठी (Pune) अत्यंत महत्वाची बातमी आहे. खडकवासला धरणातून (Khadakwasla dam) पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळं पुणे शहरातील मुठा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढू लागली आहे.  नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात साचलं पाणी साचलं आहे. नदीपात्रात असलेली वाहने काढण्याचे काम सुरु केलं आहे. 


 मुठा नदी पात्रात विसर्ग वाढवला


प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 27 हजार 841 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये. तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन मुठा कालवे विभागाच्या प्रशासनानं केलं आहे. 


मुठा नदी पात्रात 35 हजार 310 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू


प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार खडकवासला धरणातून रात्री 11 वाजता मुठा नदी पात्रात 35 हजार 310 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये; खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व वेळेनुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी असंही प्रशासनाने सांगितलं आहे.


खडकवासला पाठोपाठ पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना


खडकवासला पाठोपाठ पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पवना धरण सद्यस्थितीत 99% भरलेले असून पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे. धरणात येणारा येवा विचारात घेता लवकरच पाणीसाठा 10 % होण्याची दाट शक्यता आहे. सद्यस्थितीत धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता जलविद्युत केंद्रामधून विद्युतगृहाद्वारे 1400 क्युसेक्स इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग सुरू असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार सांडव्याद्वारे विसर्ग सोडण्यात येणार आहे.  पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे की, नदीपात्रात कोणीही उतरू नये. नदीमधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील सर्व नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत  जलसंपदा विभागास/प्रशासनास सहकार्य करावे असे सांगण्यात आले आहे. शनिवार ते सोमवार (दि. 24  ते 26) हे तीन दिवस पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट तर मंगळवारी (दि. 27) यलो अलर्ट दिला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Pune Rain Update: पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस; नदीकाठच्या सतर्कतेचा इशारा, खडकवासला धरणातून विसर्ग सुरू