In Pune Truck Fell Into Pit : पुण्यामध्ये नागरी समस्यांचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. दररोज वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त असतानाच रस्त्यावरील गुडघाभर खड्डे सुद्धा दररोज अपघाताला निमंत्रण देत आहेत. चिमुटभर पावसात सुद्धा रस्ते तुंबून पुणे ठप्प होत असल्याच्या घटना सुद्धा पावसाळ्यात घडल्या. रस्त्यावरील खड्डे पुणेकरांना त्रस्त करून सोडत असताना आज (20 सप्टेंबर) दुपारी एक भयंकर घटना पुण्यामध्ये घडली. पुण्यामधील समाधान चौक परिसरातील सिटी पोस्ट आवारामध्ये अचानक पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून संपूर्ण ट्रक थेट खड्ड्यांमध्ये कोसळल्याची घटना घडली.


मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक पुणे महापालिकेचा असल्याचे समजते. प्रसंगावधान ओळखून ड्रायव्हरने उडी मारल्याने जीव वाचला आहे. पेविंग ब्लॉकने रस्ता माखलेला असताना सुद्धा अचानक खड्डा पडून संपूर्ण ट्रकच खड्ड्यांमध्ये गेल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर अग्निशामन दलाला माहिती कळवण्यात आली. अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ट्रकसोबत दोन दुचाकी सुद्धा खड्ड्यात गेल्या आहेत.   


इतर महत्वाच्या बातम्या