पुणे : काही वेळात भारतीय संघ विश्वचषक उंचावण्यासाठी ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. रोहित आणि टीमला पाठिंबा देण्यासाठी क्रिकेट प्रेमी उत्साहात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ही क्रिकेट प्रेमी पाटील मिसळच्या हॉटेल मालकाने अनोखी ऑफर ठेवली आहे. अंतिम सामन्याचा दिवस असल्याने या हॉटेलमध्ये दोन मिसळवर एक मिसळ फ्री ठेवण्यात आली तर भारत जिंकणार असल्याचा विश्वास असल्याने त्यांनी उद्या ऐका मिसळ वर ऐक मिसळ फ्री ठेवली आहे. त्याचा क्रिकेप्रेमी आस्वाद घेत आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देशांचं लक्ष आज (ICC World Cup 2023 Final) वर्ल्डकप मॅचकडे आहे. प्रत्येक क्रिकेटप्रेमी या मॅचसाठी उत्सुक आहे. सगळ्याच देशांचं लक्ष आज क्रिकेटकडे लागलं आहे. त्यामुळे आता भारतीय संघ भारी पडतो कि ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्डकपवर आपलं नाव कोरतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र याच सामन्यासाठी भारतभर वेगवेगळी तयारी सुरु आहे. भारताला वर्ल्डकपचं प्रचंड वेड आहे. अशाच एका पिंपळे सौदागरमधील क्रिकेटप्रेमीने मिसळीवर खास ऑफर ठेवली आहे. पुण्यात क्रिकेकप्रेमी जेवढे आहेत तेवढेच मिसळ प्रेमीदेखील आहे. दोन्हीचं औचित्य साधून आज पुणेकर क्रिकेट पाहता पाहता मिसळीवर ताव मारताना दिसत आहे. सकाळपासूनच पाटील मिसळच्या या आस्वाद घेण्यासाठी पिंपरी-चिंचवडकर गर्दी करताना दिसत आहे.
पुण्यात अनेक ठिकाणी बिग स्क्रिन वर्ल्डकप स्क्रिनींग...
पुण्यात यंदा बऱ्याच वर्षांनंतर यंदा वर्ल्डकपचे सामने झाले. त्यामुळे यंदा पुणेकरांनी वर्ल्डकपचे सामने अनुभवले. या सामन्यासाठी पुणेकरांनी तुफान गर्दी केली होती. 20 वर्षाहून अधिक वर्षांनंतर हे सामने रंगल्यामुळे पुणेकरांनामध्ये तुफान उत्साह पाहायला मिळाला होता. त्यात इंडिया टीम आज वर्ल्डकप फायनलमध्ये खेळणार असल्याने पुणेकरांमध्ये चांगलीच उत्सुकता दिसत आहे.
3D रांगोळी काढून क्रिकेटविरांना सलामी...
क्रिकेटप्रेमी आपापल्या कलेतून क्रिकेटविरांना सलामी देताना दिसत आहे. त्यासोबतच क्रिकेट विरांना शुभेच्छादेखील देताना दिसत आहे. पुण्यातील रांगोळी कलाकारांनी क्रिकेटविरांची 3D रांगोळी साकारली आहे. शारदा अवसरे, मयुरी अष्ठेकर, माधुरी डोंगरे, अक्षय वाळुंज या कलाकारांनी रांगोळी साकारली आहे. सोशल मीडियावर सध्या या रांगोळीची चर्चा होत आहे. पुण्यातील क्रिकेटप्रेमी आपापल्यापरीने क्रिकेकविरांना महामुकाबल्यासाठी शुभेच्छा देताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ: