पुणे : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) नॉट रिचेबल असून पुणे पोलिसांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात मानसिक छळवणुकीची तक्रार दिली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन वेळा नोटीस देऊन सुद्धा पूजा खेडकर उपस्थित राहिल्या नाहीत. 

Continues below advertisement

पूजा खेडकर यांच्या विरोधात दिल्ली क्राईम ब्रँचने गुन्हा दाखल केला असून त्या प्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याने पूजा खेडकर नॉट रिचेबल झाल्याची चर्चा आहे. 

पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. तशी तक्रार त्यांनी दाखल केल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. पण दोन नोटीस देऊनही पूजा खेडकर या चौकशीसाठी गेल्या नाहीत. पुणे पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद लागत आहे. 

Continues below advertisement

मसुरी प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहण्याचे आदेश

पूजा खेडकर यांच्यावर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याचा आणि बनावट ओबीसी नॉन क्रिमी लेअर दाखला काढल्याचा आरोप केला गेला. त्यानंतर केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने त्याची चौकसी करण्यासाठी एक सदस्यीय समिती नेमली. त्या समितीचा अहवाल आता आठवडाभरात येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे पूजा खेडकर यांचे राज्यातील प्रशिक्षण कार्यकाळ थांबवण्यात आला असून 23 जुलै पर्यंत त्यांना मसुरीतील प्रशिक्षण संस्थेमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पूजा खेडकर त्या ठिकाणी परत हजर होतात का हे पाहावं लागेल. 

दिल्लीमध्ये गुन्हा नोंद

पूजा खेडकर यांच्यावर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याचा आरोप होत असताना त्याची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिस सरसावले आहेत. दिल्ली क्राईम ब्रँचने पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा नोंदवला असून त्याची चौकशी होणार आहे. 

दिल्लीमध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर पूजा खेडकर यांच्या अडचणीत आता वाढ झाली असून या प्रकरणी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला असून त्या सध्या अटकेत आहेत. 

ही बातमी वाचा: