Hindu Janakrosh Morcha: आज पुण्यात (Pune News) हिंदू जनआक्रोश मोर्चा (Hindu Janakrosh Morcha) काढण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता या मोर्चाला लाल महालापासून सुरुवात होणार असून डेक्कन (Deccan) भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा जाणार आहे. या मोर्चात वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटना सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारीही या मोर्चात सहभागी होणार आहेत. तेलंगणाचे आमदार राजाभय्या, धनंजय देसाई यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत. या मोर्चासाठी पुण्यातील वाहतूकीत बदल (Pune Traffic Updates) करण्यात आले आहेत. 


विश्रामबाग वाहतूक विभाग पर्यायी मार्ग असा राहील 



  • गाडगीळ पुतळ्याकडून जिजामाता चौकाकडे येणारी वाहने मशाल यात्रा बेलबाग चौक पास होईपर्यंत डावीकडे वळून कुंभारवेस मार्गे इच्छितस्थळी जातील.

  • सोन्या मारुती चौकामधून लक्ष्मी रोडने बेलबाग चौकाकडे जाणारी वाहने फडके हौद चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.

  • मशाल यात्रा सुरू झाल्यानंतर अप्पा बळवंत चौकाकडून बुधवार चौकाकडे जाणारी वाहने सरळ बुधवार चौकाकडे न जाता बाजीराव रोडने सरळ शनिवारवाडा आणि पुढे इच्छितस्थळी जातील.

  • लक्ष्मी रोडने बेलबाग चौकाकडून टिळक चौकाकडे जाणारी वाहने मशाल यात्रा खंडोजीबाबा चौकामध्ये पोचेपर्यंत सेवासदन चौकामधून बाजीराव रोडने अप्पा बळवंत चौक आणि पुढे इच्छितस्थळी जातील.

  • मशाल यात्रा बेलबाग चौकामध्ये आल्यानंतर बाजीराव रोडने येणारी वाहने पूरम चौकामधून टिळक रोडमार्गे इच्छितस्थळी जातील.

  • मशाल यात्रा टिळक चौकामध्ये आल्यानंतर शास्त्री रोडने येणारी वाहने सेनादत्त चौकामधून म्हात्रे पुलमार्गे इच्छितस्थळी जातील.


दगडूशेठ मंदिर परिसरातील वाहतूक



  • मोर्चा लाल महाल येथे जमण्यास सुरुवात झाल्यावर फडके हौद चौकाकडून येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

  • मशाल यात्रेस जिजामाता चौक येथे गर्दी झाल्यानंतर आवश्यकतेनुसार, शिवाजी रोडवरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांसाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने इच्छितस्थळी जातील.

  • गणेश रोड- दारूवाला पुलाकडून फडके हौद चौक जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक ही दारुवाला पूल आणि फडके हौद चौकातून इच्छितस्थळी जातील.

  • बाजीराव रोड पूरम चौकातून बाजीराव रोडने महापालिकेकडे येणारी वाहतूक ही सरळ टिळक रोडने अलका चौक आणि खंडोजीबाबा चौकातून जातील.

  • केळकर रोडने अप्पा बळवंत चौकाकडून जोगेश्वरी मंदिर चौकमार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद राहील.

  • लाल महाल चौकामध्ये जमण्यास सुरुवात झाल्यानंतर फुटका बुरुजकडून आणि गाडगीळ पुतळा चौकाकडून शनिवारवाड्याकडे येणारी वाहतूक पूर्णपणे महापालिका आणि कुंभारवेस चौकाकडे वळविण्यात येणार आहे.

  • सेवासदन चौक येथे मोर्चा पोचल्यानंतर फुटका बुरूज आणि गाडगीळ पुतळा येथून येणारी वाहतूक सोडण्यात येणार आहे.

  • मोर्चा बुधवार चौक येथे आल्यानंतर सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मीरोडने येणारी वाहतूक फडके हौद चौकाकडे वळविण्यात येणार आहे. मोर्चा छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथे पोचल्यानंतर अलका टॉकीजकडून येणारी वाहतूक कर्वे रोडकडे वळविण्यात येणार आहे. त्यानंतर कर्वे रोडकडून येणारी वाहतूक अलका चौकाकडे वळविण्यात येणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pune Bypoll Election : कसबा अन् चिंचवडच्या पोटनिवडणुकीबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले....