पुणे : दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणाऱ्या पुणेकरांवर पुणे पोलीस आजपासून कारवाई सुरु करणार होते. परंतु पुण्यातील विविध संघटना, संस्था आणि राजकीय पक्षांनी या हेल्मेटसक्तीला तीव्र विरोध केला. त्याबाबत प्रतिक्रिया देताना पुण्याच्या वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते म्हणाल्या की, "हेल्मेटसक्तीची आम्ही कोणतीही तारीख जाहीर केली नव्हती. त्यासाठी कायदा आहेच. त्यामुळे कारवाई करण्यासाठी कोणताही दिवस ठरवण्याची आवश्यकता नाही. आम्ही केवळ नागरिकांना शिस्त लागावी यासाठी प्रयत्न करत आहोत."
1 जानेवारीपासून पुण्याच हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे पुणे वाहतूक पोलिसांनी जाहीर केले होते. आता तेच पोलीस म्हणत आहेत की, "हेल्मेटसक्तीसाठी कारवाईची कोणतीही तारीख जाहीर केली नव्हती, परंतु नागरिकांना शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलीस विभाग प्रयत्नशील आहेत."
दरम्यान, हेल्मेटसक्तीविरोधात पुणेकर 3 जानेवारीला विनाहेल्मेट दुचाकी रॅली काढणार आहेत. पत्रकार संघ ते पुणे पोलीस आयुक्तालय अशी रॅली काढून पुणेकर विरोध प्रदर्शन करणार आहेत. रॅलीनंतर पुणे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांना निवेदन दिले जाणार आहे. हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
संबधित बातमी : पुण्यात आजपासून हेल्मेटसक्ती, 3 जानेवारीला विनाहेल्मेट रॅली
हेल्मेटसक्तीवरुन पुणेकरांसमोर पोलीस नरमले!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 2019 06:05 PM (IST)
दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणाऱ्या पुणेकरांवर पुणे पोलीस आजपासून कारवाई सुरु करणार होते. परंतु पुण्यातील विविध संघटना, संस्था आणि राजकीय पक्षांनी या हेल्मेटसक्तीला तीव्र विरोध केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -