Pune Rain : सध्या राज्यात परतीच्या पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात हा पाऊस कोसळत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातही परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे. काल दुपारनंतर पुण्यात झालेल्या पावसानं पुणेकरांची चांगलीच तारंबळ उडवली. दीड ते दोन तास सरु असलेल्या पावसानं सगळीकडं पाणीच पाणी केलं आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान, पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील पावसाच्या पाण्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होते आहे.
या भागातील रस्त्यांवर साचलं पाणी
मुसळधार पावसामुळं पुण्यात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. शिवाजी नगर, संगमवाडी, येरवडा, जंगली महाराज, रस्ता, टिळक रस्ता, आपटे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. दीड ते दोन तासाच्या पावसानं सगळीकडे दाणादाण उडाली आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरीकांची मात्र चांगलीच धावपळ झाली. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शहरात वाहतूक कोंडी झाली आहे. या परतीच्या पावसामुळं पुणेकर मात्र हैराण झाले आहेत.
पुढील दोन दिवस पुण्यासाठी यलो अलर्ट जारी
गेल्या तीन ते चार दिवसात परतीच्या पावसानं पुण्यासह महाराष्ट्राला झोडपलं आहे. या पावसामुळं औरंगाबाद, नाशिक, परभणी, जालना, बीडमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर पुण्यात काल चार ते पाच दरम्यान झालेल्या पावसानं अनेक ठिकाणी पाणीच पाणी साचलं होतं. अशातच आता पुणे जिल्ह्याला दोन दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर दिवेघाटात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. रस्त्यांवर अक्षरशः पाण्याचे लोट वाहताना दिसत होते.
राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाची हजेरी, शेती पिकांचे नुकसान
राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाची हजेरी लावलसी आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. या पावसाचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्याचबरोबर राज्यातील सिंधुदुर्ग, पुणे, परभणी, लातूर, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार बॅटींग केली आहे. या परतीच्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Maharashtra Rains: परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा; सरकारचे स्पष्ट निर्देश